जिल्हा जळगाव तालुका पाचोरा शिंदे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च पाचोरा यांची शंभर टक्के निकालाने गगणभरारी…डी’ फार्मसीच्या विद्यार्थ्यांची पदविका मिळवत कौतुकास्पद कामगिरी

पाचोरा-गिरणाई शिक्षण संस्था संचलित शिंदे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च पाचोरा येथे घेण्यात आलेल्या सन २०२४ – २५ या शैक्षणिक वर्षाचा डी.फार्मसी या डिप्लोमा कोर्सचा निकाल नुकताच जाहीर झाला असून शंभर टक्के निकाल लागलेला आहे. त्यामध्ये शिंदे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च पाचोरा यांच्या परीक्षेस बसलेल्या प्रथम बॅचने पदविका संपादन करून महाविद्यालयाचे नाव लौकिक केले आहे यामध्ये दुसऱ्या वर्षातील शितल अग्रवाल (प्रथम) दिव्या ठाकरे (द्वितीय) तर ममता ठाकरे ही (तृतीय) क्रमांक तसेच इतर सर्व विद्यार्थी पदविका मिळवत उत्तीर्ण झाली आहेत तर डी.फार्मसी या प्रथम वर्षात गायत्री पवार (प्रथम) प्रतिभा तेली (द्वितीय) तर हर्षदा पाटील (तृतीय) यांच्यासह परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होऊन द्वितीय वर्षात आपला प्रवेश निश्चित केला आहे यंदाचा निकाल बघता नेहमी प्रमाणे मुलींनी यावेळी देखील चांगली कामगिरी करत नंबर पटकावले आहेत या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष श्री तात्यासाहेब पंडीतराव शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मनोज पाटील यांनी केले आहे पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील शिक्षणक्षेत्रात नावलौकिक असलेल्या गिरणाई शिक्षण संस्थेच्या नुकत्याच काही वर्षाआधी सुरू झालेल्या शिंदे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च च्या या निकालाने संस्थेच्या शिरपेचात एक नवा मानाचा तुरा रोवला गेला आहे शिंदे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी सुविधा व आनुषंगिक बाबी उपलब्ध असल्याने पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील फार्मसी (औषध निर्माणशास्त्र) क्षेत्रात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना व पालकांना सोयीचे झाले आहे तसेच नवीन शैक्षणिक वर्ष २०२५ – २६ साठी महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया व नाव नोंदणी सुरु झाली असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मनोज पाटील यांनी यावेळी सांगितले



