शिवशाही बसला भीषण अपघात दहा प्रवासी ठार

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी तालुक्यात खजरी गावाजवळ शिवशाही बसला भीषण अपघात झाला असून त्यात सुमारे दहा प्रवासी जागेवर मृत्यू पावले आहे तर 30 ते 35 प्रवासी जखमी झाल्याचे समजते आज दिनांक 29//11/2024 रोजी शुक्रवार सकाळी भंडारा आगारातून सुटलेल्या शिवशाही बस गोंदियाला जात असताना अर्जुनी रस्त्यावर बिंद्रावन टोला गावाजवळ ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले यामुळे बस रस्त्याच्या बाजूला पलटी झाली या अपघातात आतापर्यंत दहा प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे तर तीस ते पस्तीस जखमी झालेले आहे या अपघातात जखमी झालेल्यांना गोंदिया जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे हा अपघात इतका भीषण होता की मृतांची संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे पुढील तपास अर्जुनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक करीत आहे मृतांना व अपघातग्रस्तांना तातडीची मदत मुख्यमंत्री देणार का भारतात अपघाताची संख्या रोज वाढत असून जन्मदरापेक्षा जास्त आहे


