ताज्या बातम्या

महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदारांचा भ्रष्टाचार कोण रोखणार,? गहू तांदूळ 50 किलो गोणी वर लिहिलेल असत मग 50 किलो सरासरी येत नाही 47 किंवा 45 किलो वजन भरते हा काळा बाजार कोण करतो?


महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदारांचा भ्रष्टाचार कोण रोखणार,? गहू तांदूळ 50 किलो गोणी वर लिहिलेल असत मग 50 किलो सरासरी येत नाही 47 किंवा 45 किलो वजन भरते हा काळा बाजार कोण करतो? अन्नपुरवठा महाराष्ट्र राज्य अधिनियम शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत मोठ्या प्रमाणात राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्था हाताळली जाते सदर वितरण व्यवस्था ही महसूल प्रशासनाशी निगडित असून काही वर्षांपूर्वी अन्न व नागरी पुरवठा विभागाने अव्वल कारकून दर्जाच्या 35 कर्मचाऱ्यांना नायब तहसीलदार पदी पदोन्नती दिली राज्य शासनाच्या नायब तहसीलदार दर्जाचे अधिकारी हे राज्य लोकसेवा आयोगाचे वर्ग दोनचे अधिकारी म्हणून राज्यसेवेद्वारे भरती होत असतात तसेच महसूल प्रशासनातील अव्वल कारकून दर्जाचे अधिकारी नोकरीच्या अगदी शेवटी शेवटी न्याय तहसीलदार होत असतात, परंतु अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अव्वल कारकून दर्जाच्या कर्मचाऱ्यांना डायरेक्ट नायब तहसीलदार पदी कमी वेळात बसविल्याने त्यांच्या भ्रष्टाचाराचा व कामाच्या अनुभवाचा मोठ्या प्रमाणात प्रशासनाला व जनतेला त्रास होत असून सदर नायब तहसीलदार दर्जाचे अधिकारी हे डायरेक्ट जनता रेशनचे पात्र लाभार्थी रेशन दुकानदार यांच्याकडून खुलेआम पणे पैसे मागतात सदर नायब तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाची कोणतीही जाणीव नाही त्यांचे एकमेव लक्ष म्हणजे आपण कमी वेळात नायब तहसीलदार झालेलो असल्याने फक्त आपली वसुली करणे हेच आपले कर्तव्य आहे असे ते मानतात याबाबत राज्य शासनाने भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांना पत्र देऊन यांच्या वाढलेल्या मालमत्ता व चालू असलेली कार्यपद्धती कार्यपद्धती याबाबत दिशा निर्देश ठरवून कारवाई करण्याचे आदेश देणे आवश्यक आहे तसेच राज्यातील सर्व भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षकांनी याबाबत कार्यपद्धती ठरविणे आवश्यक आहे त्यामुळे जनतेची व प्रशासनाची लूट होणार नाही शासनाने दिलेल्या 50 किलो गोणीचे वजन 45 किलो किंवा 47 किलो भरते हे धान्य कमी का येते याच्या मध्ये कोण काळाबाजार करतात काही रेशन दुकानावर रेशन दुकानदार सांगतात की वरूनच रेशन कमी आलेले आहे ते ग्राहकांना कमी देत असतात याचे कारण महत्त्वपूर्ण आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button