जिल्हा जळगाव तालुका पाचोरा लोहारा येथे जागतिक दिव्यांग दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा लोहारा तालुका पाचोरा एकता दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेतर्फे जागतिक दिव्यांग दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला

जागतिक दिव्यांग (अपंग) दिन दरवर्षी दिनांक 3 डिसेंबर रोजी जगभरात जागतिक दिव्यांग (अपंग) दिन म्हणून साजरा केला जातो संयुक्त राष्ट्रसंघातर्फे सन 1992 पासून जागतिक (अपंग) दिव्यांग दिन जाहीर करण्यात आला तेव्हापासून 3 डिसेंबर रोजी संपूर्ण जगभरात जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो दिव्यांग दिनाच्या कार्यक्रमात दिव्यांग दिनाचे औचित्य साधून दिव्यांगांना शासनाचे निर्णय व परिपत्रक यांची माहिती व मार्गदर्शन करण्यात आले तसेच दिव्यांगांसाठी दिव्यांगांनी केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून विकास शिवदे-भोई व अनिल चौधरी-न्हावी यांचा कर्तबगार दिव्यांग कार्यकर्ते म्हणून मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे डॉ.कुणाल परदेशी व प्रशांत मालेकर यांनी गीता भागवत मार्गदर्शन आणि लहान मुलांना टीव्ही व मोबाईल पासून कसे दूर ठेवता येईल याबद्दल मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महेंद्र आप्पा शेळके होते ग्रामपंचायत उपसरपंच दीपक खरे भाजपा कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य कैलास आप्पा चौधरी प्रथमेश मराठा समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रतापराव सुर्वे माळी समाजाचे अध्यक्ष श्रीकृष्ण भिवसने डॉक्टर सुभाष घोंगडे संजय पाटी सुभाष बाविस्कर उमेश सूर्यवंशी (महाराष्ट्र पोलीस) महेंद्र शेळके पत्रकार संघाचे अध्यक्ष दीपक पवार कृष्णा आप्पा शेळके रमेश आप्पा शेळके चंद्रकांत पाटील दिलीप चौधरी अनिल तडवी गजानन क्षीरसागर हे उपस्थित होते यावेळी कैलास आप्पा चौधरी यांनी जागतिक दिव्यांग दिनाचे महत्व विशद करून सांगितले तसेच दिव्यांना कशाप्रकारे सरकार न्याय मिळवून देण्याचे काम करत आहे हे पत्रकार दीपक पवार यांनी सांगितले यावेळी रमेश लिंगायत प्रभाकर चौधरी गुरुजी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन एकता दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी केले गावातील बरेचसे प्रमुख व्यक्ती हजर होते सदर कार्यक्रमास एकता दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश पाटील सचिव विजय जाधव खजिनदार कांतीलाल राजपूत सदस्य विकास शिवदे भोई अनिल चौधरी न्हावी बाळू जाधव अनिल राजपूत प्रवीण शेळके व गावातील व परिसरातील दिव्यांग बंधू व भगिनी उपस्थित होते









