ताज्या बातम्या

छायाचित्रकार PRESS रिपोर्टर माध्यम प्रतिनिधी व जळगांव जिल्ह्यातील महिलांनी मोठया संख्येने उपस्थिती द्यावी राजे छत्रपती जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष! लीना पवार


राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त 18 फेब्रुवारी रोजी जिजाऊ ब्रिगेड तर्फे मशाल रॅलीचे आयोजन जळगांव मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड यांची प्रदेशाध्यक्ष सीमाताई बोके यांच्या निर्देशांनुसार महिलांना जागृत व स्वप्रेरित करण्याकरिता जिल्हाअध्यक्ष लीना पवार यांच्या निवास स्थानी “शिवविचार बैठक” घेण्यात आली या प्रसंगी पदाधिकाऱ्यांनी अनेक ज्वलंत विषयांवर चर्चा केली वाचन चळवळ विकसित व्हावी या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन तज्ञ सल्लगार ज्योती पाटील यांनी केले तसेच यावेळी 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त 18 फेब्रुवारीला घेण्यात येणाऱ्या मशाल रॅलीचे नियोजन करण्यात आले या मशाल रॅलीची सुरुवात सायंकाळी 5 वाजता फुले मार्केट महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करून करण्यात येणार असून हिची सांगता शिवतीर्थ मैदान राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ होणार आहे या रॅलीस सर्व माध्यम समूहाचे प्रतिनिधी व जळगांव जिल्ह्यातील महिलांनी आपल्या मैत्रीणीसह मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा अध्यक्ष लीना पवार यांनी केले आहे या प्रसंगी जिजाऊ ब्रिगेड कार्यकारिणी यांच्या सर्वानुमते पत्रकार पल्लवी भोगे (पाटील ) यांची जिजाऊ ब्रिगेड मीडिया प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली प्रसंगी समन्व्यक चेतना देवरे यांनी सकाळ “तनिष्का व्यासपीठ” या संबंधित माहिती दिली या शिवविचार बैठकीला कांचन पाटील जिल्हा सचिव ज्योती पाटील तज्ञ सल्लगार वर्षा पाटील जयश्री पाटील कोषाध्यक्ष सोनाली पाटील स्मिता सिसोदे शहराध्यक्ष जयश्री देवरे शीतल पाटील पूनम पवार मेघा जाधव दीपाली पाटील सह जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व पदाधिकारी उपस्थित होत्या


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button