ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव तालुका पारोळा वाणी समाज महिला मंडळाच्या कार्यक्रमात सहभागी महिला मंडळाच्या अध्यक्ष! वर्षा पुरकर यांनी सांगितले पिढी घडवण्याचे खरे कार्य महिलांच्या हातून होते


पारोळा येथे वाणी समाज महिला मंडळाच्या लाडशाखीय वाणी समाज संस्कृती महिला मंडळाच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भारत माता प्रतिमेची पूजन व हळदीकुंकू समारंभात माता महिला व प्रौढ मुलींनी मोठ्या उत्स्फूर्तिने भाग घेतला मंडळाच्या अध्यक्ष वर्षा पुरकर यांनी मकर संक्रांत निमित्त व प्रजासत्ताक दिनाच्या भारत मातेच्या पूजनाचे तसेच हळदी कुंकाचे महत्त्व श्रीया कशाप्रकारे कौटुंबिक जबाबदारी महत्त्वाची भूमिका करतात त्याविषयी भूमिका मांडली भारतातील किंवा जगातील महिला पिढ्यान पिढ्या घडवण्याचे कार्य करतात अमृतकर यांनी महिलांचे स्वागत केले व त्यानंतर स्वागत गीत सादर केले तर हेमलता चांदवडे व सुनंदा शेंडे यांनी कुलस्वामिनी जागर गीत गायले यावेळी पतंग महोत्सवा बरोबरच विविध स्पर्धा प्रश्नमंजुषा कार्यक्रमात महिलांनी टाळ्या वाजवून स्पर्धकांना प्रोत्साहन दिले विविध स्पर्धेमध्ये विजेत्या ठरलेल्या स्वप्ना अमृतकर वंदना शेंडे यांना बक्षीस देऊन गौरव करण्यात आले उपस्थित महिलांमधील वैशाली मनोज अमृतकर या पैठणीच्या मानकरी झाल्या तर सहा विजेता व सपना रमेश अमृतकर या उपविजेता ठरल्या


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button