पाचोरा भडगावचे आमदार मां किशोर पाटील ॲक्शन मोडमध्ये आठ दिवसात कारखानदारी व दोन नंबर उद्योग बंद करा तर आम्ही स्वतः कार्यवाही करू जिल्हा जळगाव तालुका पाचोरा जारगाव येथील सुदामा रेसिडेन्सी अवैध कारखानदारी दोन नंबर उद्योगामुळे 1 वर्षापासून अनेक निवेदने दिली गेली होती उपयोग झाला नाही म्हणून शेवटी आमरण उपोषण 4 दिवसापासून सुरू होते

सुदामा रेसिडेन्सी जांरगाव येथे सुरु असलेले अवैध कारखादारी उद्योग धंद्याचे अतिक्रमण व नागरीकांच्या मूलभूत सुविधा गटार रस्ता सांडपाणी व्यवस्था या संदर्भात सुदामा रेसिडेन्सी बचाव कृती समितीचे अध्यक्ष आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते व समता सैनिक दलाचे जिल्हा अध्यक्ष किशोर डोंगरे यांचे आमरण उपोषण 24 जानेवारी म्हणजे गेल्या 4 दिवसा पासून सुरु असुन आज दि.27 जानेवारी रोजी मा.आमदार किशोर पाटील व प्रशासकीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व मागण्या मंजूर करत उपोषणाची सांगता करण्यात आली या वेळी मा.आमदार किशोर पाटील मा. प्रांत अधिकारी भुषण आहिरे मा.गटविकास अधिकारी बोरसे मा.तहसीलदार विजय बनकर मा.उपविभागीय पोलिस अधिकारी येरुळे पोलिस निरीक्षण अशोक पवार ग्रामसेवक व पाचोरा शहरातील सर्व प्रतिष्ठित मान्यवर आणि पत्रकार बंधू यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत जांरगाव यांनी लेखी पत्र देवून सांगता करण्यात आली


