जिल्हा जळगाव तालुका पाचोरा चला पुतळा उभारणीत आपले योगदान देऊ या !आज पाचोरा तालुक्यातील आंबेडकरी अनुयायांची महत्वपूर्ण बैठक डॉ: बाबासाहेब यांनी संपूर्ण जगाचे कल्याण संविधानात केले

चला पुतळा उभारणीत आपले योगदान देऊ या !आज जिल्हा जळगाव तालुका पाचोरा आंबेडकरी अनुयायांची महत्वपूर्ण बैठक पाचोरा शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नवीन पुतळ्याची उभारणी आगामी दि.14 एप्रिल 2025 पूर्वी करण्याचा मानस आहे. याबाबत आवश्यक ते निर्णय घेण्यासाठी आज शुक्रवार दि.24 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12:30 वाजता पाचोरा मुख्याधिकारी यांचे कक्षात आ.किशोर आप्पा पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये बैठक आयोजित केली आहे या बैठकीला पुतळा शिल्पकार वास्तू विशारद मुख्याधिकारी मंगेश देवरे यांचेसह सर्व आंबेडकर प्रेमी नागरिक बंधू भगिनी उपस्थित राहणार आहेत या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्याची उंची सुशोभीकरण व परिसर सौंदर्यवाढ याबाबत अंतिम निर्णय होणार आहेत. तरी कृपया आपण सर्वजण या अतिशय महत्वपूर्ण बैठकीस उपस्थित रहावे ही नम्र विनंती सदर बैठक ही सार्वजनिक स्वरूपाची असल्याने कोणालाही व्यक्तिगत फोन केले जाणार नाहीत.हा संदेश हेच सर्वांनी बैठकीचे निमंत्रण समजून बैठकीला हजर रहावे. एकदा या बैठकीत अंतिम झालेले निर्णय वेळेची मर्यादा असल्याने नंतर बदलता येणार नाहीत त्यामुळे आपणा सर्वांच्या अमूल्य सूचनांसह आपण या बैठकीस सादर निमंत्रित आहात धन्यवाद







