स्वर्गीय संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत स्वस्त बसणार नाही पैठण येथील भाषणात मराठा योद्धा जरांगे पाटील देशमुख हत्या प्रकरणात ७ आरोपीवर मोक्का वाल्मीक कराड हत्या प्रकरणातील आरोपी नाही गौड बंगाल काय आहे?

स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत स्वस्त बसणार नाही पैठण येथील भाषणात मराठा योद्धा जरांगे पाटील यावेळी मंचावर आमदार सुरेश धस माजी मंत्री अनिल पटेल संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सचिन घायाळ पाचोडचे सरपंच शिवराम भुमरे माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे राजू गायकवाड लक्ष्मण आवटे त्याचबरोबर देशमुख कुटुंब व सूर्यवंशी कुटुंब उपस्थित होते वर्षभरात परळीत 109 मृतदेह लोकशाहीला शोभा न देणारे गृहमंत्री करतात तरी काय याचे उत्तर जनता विचारत आहे ज्या मंत्र्यांचे नाव येत आहे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे चौकशी होईल पण जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत खरी लोकशाही अस्तित्वात येणार नाही असे प्रतिपादन माननीय मराठा योद्धा जरांगे पाटील यांनी सांगितले लोकशाहीला काळेमा फासणारे कार्यक्रम सरकार करीत आहे बेरहिमी विनाकारण खून असे अनेक प्रकार घडले आहेत आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली आतापर्यंत 109 मृतदेहांची ओळख पटलेली नाही यंत्रणा काय करते पोलीस यंत्रणा खून झाले काय अटॅक आला नेमके कारण काय याची चौकशी सुद्धा नाही धनंजय मुंडे यांची कोटीची मालमत्ता विविध मार्गाने जमली असून त्याची कसून चौकशी सरकार का करीत नाही तसेच संतोष देशमुख यांचा मारेकरी कराड याच्या नावावरील बेकायदा मालमत्ता फ्लॅट आले कुठून याची चौकशी झाली पाहिजे काही मालमत्ता त्याच्या नातेवाईक व ड्रायव्हरच्या नावावर असून त्याची ही चौकशी झाली पाहिजे संतोष सरपंच व सूर्यवंशी यांची क्रूर हत्या करण्यात आली परभणी पोलीस यांच्या मारहाणीत सूर्यवंशी यांच्या हत्या विरोधात पैठण येथे मोर्चा काढण्यात आला या भव्य आक्रोश मोर्चा कैलासवासी दिगंबर कावसानकर स्टेडियम पासून बस स्टॅन्ड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी मोठ्या गर्दीने करण्यात आला आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली मराठा योद्धा मनोज जरांगे स्वर्गीय संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी यांचे कुटुंबीय सुद्धा होते देशमुख हत्या प्रकरणात ७ आरोपीवर मोक्का वाल्मीक कराड हत्या प्रकरणातील आरोपी नाही गोड बंगाल काय आहे?



