५ जानेवारी १८४३ रोजी चा जन्ममुक्ता_साळवे क्रांती कन्या 182 व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

५ जानेवारी १८४३ रोजी चा जन्म मुक्ता_साळवे क्रांतीमाता सावित्री माईच्या शाळेतील पहिली मातंग समाजातील ज्ञान तपस्विनी क्रांति कन्या मुक्ता साळवे यांच्या 182 व्या जयंती निमीत्त त्यांना विनम्र अभिवादन “मांग आणि महारांच्या दुःखाविषयीचा निबंध”.. हा लेख ज्ञानोदय मासिकात प्रकाशित झाला आणि सगळीकडं एकच चर्चा होती मुक्ता साळवे कोण ? लहूजी वस्ताद साळवेंची नातलग आणि सावित्रीबाई फुलेंनी 1848 ला सुरु केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेतली विद्यार्थीनी मुक्ता. पण फक्त इतकीच तिची ओळख मर्यादीत नव्हती वयाच्या १४ व्या वर्षी दलित म्हणून तिच्या जगण्याची संघर्षाची दुःखाचं लिखाण तिने केलं. तो निबंध 1855 ला ‘ज्ञानोदय’ या मासिकात प्रकाशित झाला होता ब्राम्हण लोक म्हणतात की, इतर जातींनी वेद वाचू नयेत याचा अर्थ आम्हास धर्म-पुस्तक नाही मग आम्ही धर्मरहित आहोत का? तर हे भगवान आम्हाला आमचा धर्म कोणता ते सांगा हे लिहणाऱ्या मुक्ताला समाज व्यवस्थेची किती तीव्र जाणीव असेल हे वेगळं सांगयला नको मुक्ता साळवे या भारतातील पहिल्या विद्रोही महिला साहित्यिक ठरतात.त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन

