जळगाव जिल्ह्यातील भ्रष्टाचारी आरटीओ दिपक पाटील यांना निलंबित करा सामाजिक कार्यकर्ते गणेश ढेंगे

जळगाव जिल्ह्यातील भ्रष्टाचारी आरटीओ अधिकारी दीपक पाटील यांना निलंबित करा असे पत्र मुख्यमंत्री व परिवहन मंत्री यांना दिले आहे जळगाव परिवहन विभाग अधिकारी दीपक पाटील व त्यांच्या विभागात काम करणारे इन्स्पेक्टर नवापूर (सीमा) नाका येथे येथे ड्युटी लावण्यासाठी तीन लाखाची खंडणी मागणारे दीपक पाटील व त्यांचे पटर भिकन भावे यांना डिसेंबर महिन्यात रंगेहात औरंगाबाद येथील अँटी करप्शन विभागाचे अधिकारी यांनी पकडले त्यानंतर जळगाव परिवहन अधिकारी दीपक पाटील व त्यांचा पंटर भिकन भावे यांना जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले अचानक दीपक पाटील यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यामुळेच दीपक पाटील यांना अटक करण्यात आली नाही मागच्या महिन्यात घडलेली घटना अजून पर्यंत दीपक पाटील यांना अटक झाली नाही त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला व त्यांचे निलंबन ही झाले नाही संविधानाच्या विरोधात कार्यक्रम सुरू असून दीपक पाटील यांना कोणाचा आशीर्वाद अँटी करप्शन विभागाने मुद्देमाल सहित पकडल्यामुळे कार्यवाही 100% झालीच पाहिजे होती पण तसे झाले नाही उलट तपास अधिकारी यांच्यावर संशय व्यक्त करण्यात येत आहे यांना अटक का झाली नाही एवढा मोठा गुन्हा असल्यामुळे पीसीआर व एमसीआर काहीच झालेलं नाही दीपक पाटील यांचा पर्सनल सेक्रेटरी भिकन भावे याला एक दिवस अटक करून दुसऱ्या दिवशी जामीन मंजूर झाला या दोन्हींच्या फोन च्या डिटेल्स सीडीआर तपासणी करून कार्यवाही करण्यात यावी असे सामाजिक कार्यकर्ते गणेश ढेंगे यांनी आपल्या अर्जात मागणी केली आहे डिसेंबर महिन्यात सीमा नाक्यावर ज्या इन्स्पेक्टरची ड्युटी लावण्यात आली होती त्यांच्या फोनची डिटेल्स सीडीआर चौकशी करण्यात यावी मलाईदार चेक पोस्ट नाक्यावर किती वसुली झाली ही चौकशी सुद्धा करण्यात यावी यामुळे भ्रष्टाचार किती झाला हे जनतेला माहित पडेल सरकारी आदेशा ची पायमल्ली होत असून मुख्यमंत्री यांना ई-मेल अर्ज करून हि कार्यवाही होत नाही दीपक पाटील यांना सरकारी राजश्रय मिळत असल्याची चर्चा जोरात सुरू असून कार्यवाही कधी करणार अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यासाठी विलंब का? कार्यवाही लवकर करण्यात यावी असे ई-मेल पत्रात सामाजिक कार्यकर्ते गणेश ढेंगे यांनी म्हटले आहे



