ताज्या बातम्या

.जिल्हा जळगाव तालुका पारोळा क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्सवानिमित्त पारोळा क्षत्रिय माळी समाज आयोजित विविध सामाजिक उपक्रमांना उपस्थिती आमदार अमोल चिमणराव पाटील पारोळा तालुक्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील


जिल्हा जळगाव तालुका पारोळा येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. रक्तदान महादान या उपक्रमाला भेट देत रक्तदात्या तरुणांचे विशेष कौतुक केले. सायंकाळी महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर श्री जीवन महाजन सर यांचे जाहीर व्याख्यान व भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.क्रांतिसूर्य महात्मा फुले यांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत.शिक्षण,समता आणि सामाजिक न्याय यासाठी त्यांनी दिलेला लढा प्रत्येकाने आपल्या आचरणात आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.या प्रसंगी उपस्थित आमदार आदरणीय अमोल चिमणरावजी पाटील लोकनियुक्त नगराध्यक्ष दादासाहेब चंद्रकांत बी पाटील, उपनगराध्यक्ष ॲड.रोहनदादा मोरे, उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मनीषभाऊ पाटील,उपगटनेते तथा नगरसेवक पंकजभाऊ मराठे,भाजपा गटनेत्या अल्का धीरज महाजन, नगरसेवक मनोजभाऊ जगदाळे बापूसाहेब मिस्तरी विवेकभाऊ पाटील दिपकभाऊ अनुष्ठान,भाजपा तालुकाध्यक्ष अतुलआण्णा पवार, ॲड.कृतिका आफ्रे, योगेश पाटील यांचेसह कांचमाळी व फूलमाळी समाज पंच मंडळाचे आजी-माजी पदाधिकारी,सदस्य, समाज बांधव,नवयुवक मंडळ उपस्थित होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button