जिल्हा जळगाव येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ तसेच मनुस्मृति पुस्तिकेच्या प्रतिकृतीचे दहन

आजही जगात राजे छत्रपती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जातात यांचा इतिहास जगप्रसिद्ध असून इतिहासात आजही आजरा अमर आहेत सर्व संविधान प्रेमी बहुजनांना जय भारत जय संविधान दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत केलेल्या त्यां वक्तव्याच्या निषेध करून मनुस्मृतिचा धिक्कार करून दहन केले जाणार आहे याचा अर्थ असा दिसतो की संविधान यांना नको आहे आपण विज्ञान युगात वावरात आहे चंद्र आहे म्हणून शास्त्रज्ञ चंद्रावर यान पाठवतात चंद्रावर जाऊन नवीन नवीन शोध लावतात बोटावर मोजण्या इतके लोक संविधान विरोधी असे बोलतात संविधान जगात प्रसिद्ध असून त्याची अंमलबजावणी अनेक देशांनी केली संविधानाचा अभ्यास करून अनेक देशांनी महत्त्वपूर्ण विधी व कलम आत्मसात केल्या तसेच 25 डिसेंबर 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राजे छत्रपती यांच्या रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी मनुस्मृती या पुस्तिकेचे दहन केले होते संविधानामध्ये महिलांना मतदानाचा हक्क सरकारी नोकरीला असणाऱ्या महिलांना बाळांतपणासाठी सात महिन्याची सुट्टी असे अनेक मोठे मोठे निर्णय संविधानात कलमाद्वारे बाबासाहेबांनी लिहिले आहे आणि ते अमलात आणले सुद्धा संविधान एवढं चांगलं असून त्याचा विरोध का करतात संविधान विरोधी लोकांना धडा शिकवण्यासाठी यानिमित्त जळगाव रेल्वे स्टेशन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मूनुस्मृती या पुस्तिकेच्या प्रतिकृतीचे दहन केले जाणार असून सर्व बहुजन बांधवांनी या ठिकाणी उपस्थिती द्यावी
निषेध कार्यक्रम
दिनांक :- 25 डिसेंबर 2024
वेळ :- दु.12:00 वाजता
स्थळ :- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा रेल्वे स्टेशन जळगाव


