ताज्या बातम्या

महानगरपालिकेतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन आ. राजुमामा भोळे, महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते माल्यार्पण


जळगाव: क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त जळगाव शहर महानगरपालिकेच्या वतीने शनिवारी त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. येथील सेंट्रल फुले मार्केट परिसरातील महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला आमदार राजूमामा भोळे आणि महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महात्मा फुले यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण करण्यात आले. कार्यक्रमाला मनोज चौधरी (उपमहापौर), अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, दीपक सूर्यवंशी (महानगर जिल्हाध्यक्ष), अनिल अडकमोल (नगरसेवक), निलेश तायडे (नगरसेवक), विजय बांदल (नगरसेवक) यांच्यासह महानगरपालिकेचे विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button