ताज्या बातम्या

काही दिवसांसाठी दिखाऊ कार्यवाही नको! कायम स्वरुपी पिंपळगाव हरेश्वर येथील दोन नंबरचे धंदे बंद करा!!! कोणाच्या पोटावर मारण्याचा आमचा दुष्ट हेतू नाही हे सगळ्यांनी लक्षात घ्यावे काम भरपूर आहेत दुसरे उद्योग भरपूर आहेत बरबाद आपणच होत आहोत हे लक्षात घ्या भारत देश स्वतंत्र झाला परंतु देशद्रोही असल्यामुळे देशात असे फालतू उद्योगांना प्रोत्साहन मिळत आहे


उपोषण करणार ! आणि बदली तर होणारच!!जळगाव प्रतिनिधी (नीलेश पाटील)
सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार उपोषणावर ठाम आहे. उपोषण करणारे कशासाठी बसत आहे तर पिंपळगाव हरेश्वर परिसरात प्रचंड प्रमाणात वाढलेले हे बेकायदेशीर धंदे कायमचे बंद झाले पाहिजे यासाठी आमरण उपोषणासाठी बसणार आहे. दिखावा करण्यासाठी किंवा कोणाच्या विरोधात पण नाही अशी भूमिका उपोषण करणाऱ्यांची आहे. कोणी समर्थनात लिहा किंवा विरोधात लिहा .कार्यवाही करून सुद्धा लपून – छपून धंदे सुरू राहत असतील तर त्या कार्यवाहीला लोकांची आणि गृह खात्याची दिशाभूल करणाऱ्या ठरतील . दोन नंबर धंद्यांमुळे गरीबांचे संसाराचे वाटोळे होत आहे अनेक जणांनी आत्महत्या केल्या काय संविधानात असे लिहिले आहे की दोन नंबर धंदे सुरू ठेवावे? श्रीमंतांनी अधिक श्रीमंत व्हावे आणि गरिबांनी अधिक गरीब व्हावे// लहान वयोगटातील मुलांना गुटख्याचे तर , तरुणांचे व्यसनामुळे आयुष्य बरबाद होत आहे. पैसे कोण खातात हे सत्य लिहण्याची, बोलण्याची ताकद नाही. काही न्यूज मधून वाह ,वाह करणाऱ्या कार्यवाहीला प्रसिद्धी देऊन फालतूपणा करीत असल्याचे दिसून येत आहे. हे लोकांना पण समजत आहे.काय तर म्हणे काम, धंदे मिळत नाही. घर कसे चालवावे, ईमानदारी अंगात असली पाहिजे, कष्ट करण्याची दानत पाहिजे. शेतीमध्ये भरपूर काम आहे. पोट भरण्यासाठी कोणताही प्रामाणिक पणाचा धंदा करता येतो. दोननंबर धंद्यामध्ये पैसे लावणारे बरबाद , कर्जबाजारी होत आहे. दोन नंबरचा पैसा कोण जमा करत, कोण खातो हे सर्वांना माहीत आहे. मग का आठवड्यातच न्यूज ला आले होते जिल्ह्यातून दोन नंबर धंद्यांची किती रक्कम जमा होते// या धंद्याचे फायदे अधिकारी, पोलिस कर्मचारी , दोन नंबर वाल्यानाच होतो. हे खोटं आहे का,? या धंद्यातून आपल्यासमोर कोण करोडपती होत आहे. याची थोडीफार जाणीव लिहिणाऱ्यांना पाहिजे. हे धंदे कायमचे बंद झालं पाहिजे यासाठी आमचे आमरण उपोषण आहे. कोणाच्या पोटावर मारण्याचा आमचा दुष्ट हेतू नाही. दुसरा काहीच विषय नाही हे समजून घ्या!लोकं आमच्या सोबत आहे. इतरांची आम्हाला गरज वाटत नाही.आणि त्यांच्यावर भरोसा पण नाही. गद्दारांवर आमचा भरोसा नाही लोकं म्हणतात दोन नंबर धंदे बंद होऊ शकत नाही असे अनेक लोक आणि दोन नंबर धंदे करणारे म्हणतात//दोन नंबर धंद्यानवाले आपल्यासमोर करोडपती झाले त्यांनी काय रात्रीचे शेतामध्ये नांगर हाकलले का? आमच्या आंदोलनाला मनापासून दोन नंबर धंदे बंद करायचे आहे त्यांनी नक्की या// कसे बंद होत नाही पाहून घेऊ एकदा
सत्यमेव जयते !!!


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button