जळगाव महानगरपालिकेची मोहाडी गट नंबर 60 शिरसोली रस्त्यावरील 13 एकर जागा महानगर_ पालिकेची असून ही जागा वाचवण्याचे आमचे काम आहे त्यासाठी जनतेने आम्हाला निवडून दिले या जागेचे लवकरच कंपाउंड वॉलचे इस्टिमेट आता महानगरपालिकेने तयार केलेले असून या जागेमध्ये मनपा प्रशासन कंपाउंड वॉल करून जागा सुरक्षित करणार महापौर दीपमाला काळे

मोहाडी गट नंबर 60 ही शिरसोली रस्त्यावरील 13 एकर जागा महापालिकेची आहे. ही जागा माजी नगराध्यक्ष तुकाराम श्रीपत चौधरी यांनी महापालिकेसाठी विकत घेतली होती. 1997 पासून 2011 पर्यंत या जागेवर अटलांटा कंपनीचे क्रशर होते. 2011 नंतर ती जागा पडून होती. तेथे अटलांटा कंपनीची खडी देखील पडून होती. 2017-18 साली या ठिकाणी असलेले स्लॉटर हाऊस बंद करण्यात आले.तेव्हापासून ही जागा ओसाड पडून होती. दरम्यान ऑक्टोंबर 2022 ला कोरोना संपल्यावर काही तुरळक झोपड्या पाहण्यात आल्या होत्या. 2024 मध्ये तांबापुरातील रहिवाशींनी त्यांची तेथील राहती जागा विकून काही अज्ञात व्यक्तींनी पाच हजार रुपये घेऊन या नागरिकांना महापालिकेची ही जागा परस्पर विकली. या नागरिकांची नावे आजही तांबापुरा मतदान यादी मध्ये आहेत. यंदा त्यांनी याच प्रभागातून महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदान केले आहे. नुकतेच शासनाच्या महसूल विभागाकडून पारित परिपत्रकानुसार (शासन निर्णय क्रमांक : जमीन-2026/प्र.क्र.20/जमीन-1 दिनांक 25/03/2026) सन 2011 पूर्वीच्या शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमित करणेनुसार आदेश आहे. त्यात महानगरपालिका/नगरपालिका नाही. सन 2022 व 2023 नंतर तुरळक झालेल्या झोपड्यांना ही जागा महापालिकेच्या मालकी असल्याने हा निर्णय लागू होत नाही.जळगाव महानगरपालिकेच्या मालकीच्या जागा आधीच खूप कमी आहेत. जळगाव शहराच्या नागरिकांनी आम्हाला मोठ्या विश्वासाने महानगरपालिकेच्या मालमत्ता वाचविण्यासाठी येथे बसवले आहे. याद्वारे पाच हजार रुपये घेऊन आणून बसवणाऱ्या झोपडपट्टीतील लोकांना आम्ही थारा देणार नाही. या जागेचे कंपाउंड वॉलचे इस्टिमेट आता महानगरपालिकेने तयार केलेले आहे. लवकरच या जागेमध्ये मनपा प्रशासन कंपाउंड वॉल करून ही जागा संरक्षित करण्याची कार्यवाही करणार असून या पत्रकार परिषदेव्दारे तमाम नागरीकांना विनंती करीते की, तेथे कोणीही कसल्याही प्रकारचे अतिक्रमण करु नये. केल्यास स्व:खर्चाने तात्काळ काढून घ्यावे. प्रशासन लवकरच तेथील अतिक्रमण निष्कासित करणार आहे.











