जि: संभाजीनगर सोयगाव तालुक्यातील शेतकर्यांचे सिंगल फेज विद्युत पुरवठा चालू करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी महावितरण अभियंता यांची अंत यात्रा काढून निदर्शने करण्यात आले सामाजिक कार्यकर्ता शेतकरी पुत्र दिनेश गायकवाड

महावितरण कंपनीचा जाहीर निषेध वेळेवर लाईट येत नाही कमीत कमी सिंगल फेज लाईट सुद्धा महावितरण कंपनी देत नाही त्यामुळे सोयगाव तालुक्यातील शेतकरी संतप्त झाले सोयगाव महावितरण कार्यालय अभियंता व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. व येत्या दोन दिवसांत जर महावितरण अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन विद्युत पुरवठा सुरळीत चालू न केल्यास किंवा सोयगाव तालुक्यातील कुठल्याही गावात विद्युत पुरवठा बंद पडला परतुर आंदोलन करण्यात येईल असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला तर वन्य प्राणी यांच्या हल्ल्यात जिवीत हानी झाल्यास सर्व जबाबदारी महावितरणाच्या अभियंता यांची असेल व बनोटी येथील अभियंता फोन उचलत नसल्याने सर्वत्र नाराजी लेखी तक्रार देऊनही सोयगाव महावितरण कंपनीला जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे अभियंता यांची त्वरित बदली करावी सोयगाव येथील अभियंता यांनी शेतकर्यांची सिंगल फेज विद्युत पुरवठा कायम स्वरुपी चालू करतो असे सांगितले असे आश्वासन दिले त्यावेळी उपस्थित शेतकरी भगवान बारी,प्रितम बडगुजर, माळेगांव पिंप्री सरपंच दादा जाधव,संतोष जाधव,अजमल राठोड, रमेश सावळे,संदिप इंगळे, यशवंत कोतकर, विरेंद्रसिंग देशमुख पृथ्वीराज चव्हाण शुभम रोकडे अनिल फरकांडे,योगेश चव्हाण आदी.आंदोलणात सहभागी झालेल्या तालुक्यातील सर्व शेतकर्यांचे आभार शेतकरी दिनेश गायकवाड यांनी मानले.







