जिल्हा जळगाव तालुका पाचोरा गो.से. हायस्कूलच्या पर्यवेक्षकपदी एम, टी, कौंडीण्य सर यांची नियुक्ती

गो.से. हायस्कूलच्या पर्यवेक्षकपदी श्री.एम.टी.कौंडीण्य सर यांची नियुक्ती पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.गो. से.हायस्कूल पाचोरा येथील ज्येष्ठ शिक्षक श्री.एम.टी. कौंडीण्य सर यांना पर्यवेक्षक पदी नियुक्ती देण्यात आली संस्थेचे व्हॉ. चेअरमन मा. नानासाहेब श्री. व्ही.टी. जोशी यांच्या हस्ते त्यांचा या नियुक्ती बद्दल स्वागत व सत्कार करण्यात आला याप्रसंगी संस्थेचे चेअरमन मा. नानासाहेब श्री. संजय वाघ, ज्येष्ठ संचालक मा. दादासाहेब अर्जुनदास पंजाबी, मा. बापूसाहेब श्री. प्रकाश पाटील, मा.आबासाहेब श्री. भागवत महालपुरे, शाळेचे मुख्याध्यापक श्री.एन.आर.ठाकरे सर, उपमुख्याध्यापक श्री.आर.एल. पाटील सर, सर्व पर्यवेक्षक, विभाग प्रमुख व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधु भगिनी उपस्थित होते त्यांच्या या नियुक्तीबद्दल सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.










