ट्रॅप ट्रॅप म्हणत आरटीओ सह दोघांनी जंगलात धूम ठोकली चंद्रपूर येथील सोमवारी एसीबीच्या कार्यवाहीच्या ट्रॅप ची आरडा_ओरड ऐकून चक्क आरटीओ अधिकाऱ्याने जंगलात धूम ठोकली राजुरा चेक पोस्टवर ही घटना घडली

सध्या आरटीओ खात्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून अशीच घटना राजुरा तालुक्यातील लक्कडकोट येथील आरटीओ चेक पोस्टवर दिनांक 23/ 3/ 2026 सोमवारी घडली चंद्रपूर जिल्ह्यात वाघ आला वाघ आला अशी आरडाओरड झाल्यावर नागरिक जीव मुठीत घेऊन सैरावैरा पळत सुटतात या नेहमीच्या घटना चंद्रपुरात घडत असतात ही काही नवीन बाब नाही परंतु ही नवीनच घटना समोर आली आहे एसीबीच्या कार्यवाहीच्या ट्रॅपची आरटीओ अधिकाऱ्याला भनक लागतात आरटीओ अधिकाऱ्याने जंगलात धूम ठोकली एसीबी चे पथक स्थानिक पोलिसांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत आरटीओ अधिकारी व त्याच्या बरोबर असलेला पंटर यांचा शोध घेत होते एसीबीच्या पथकाने दोघां विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपधीक्षक अनिल जी टावर निरीक्षक जितेंद्र वैरागडे हेडकॉन्स्टेबल विलीन तांबडे होमेश्वर वाईलकर प्रफुल्ल भातुलकर स्वाती हिंडोरीया यांनी सोमवारी दुपारी चेक पोस्ट परिसरात सापळा रचला पवन यांच्यासाठी विलासने ट्रकचालकाकडून पाच हजार रुपयाची लास्ट स्वीकारताना साबळा रचलेले पथक त्यांच्या मागेच होते यादरम्यान विलास पवन सह येथे कार्यरत आरटीओचे अधिकारी व कर्मचारी चेक पोस्ट सोडून सैरावैरा धावत जंगलात पळ काढला कारण त्यांना ही बनक लागली होती की एसीबी चे पथक आपल्या मागावरच आहे त्यामुळे चेक पोस्टवर एकदम शांतता चेक पोस्टवर गाड्या चेक करायला कोणीच नव्हते सगळीकडे शांतता त्यानंतर एसीबीच्या पथकाने आरटीओ व त्यांच्या पटरवर गुन्हा दाखल करून स्थानिक पोलिसांच्या मदतीने दोघांचा शोध सुरू केला आहे एसीबी कडून लाचखोर आरटीओ निरीक्षक व एजंटचा शोध












