ताज्या बातम्या

जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते गुढीचे पूजन, महापुरुषांनाही माल्यार्पण करून केले वंदन जळगाव महानगरपालिकेत प्रथमच गुढीपाडव्याचा जल्लोष


जळगाव : मराठी नववर्षाचे स्वागत आणि गुढीपाडव्याचे औचित्य साधून जळगाव शहर महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच गुरुवारी, १९ मार्च रोजी अत्यंत उत्साही वातावरणात गुढी उभारण्यात आली. महापौर दीपमाला काळे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे मनपा परिसरात भक्तीमय आणि सांस्कृतिक वातावरण पाहायला मिळाले.विधीवत पूजन आणि गुढीची स्थापना गुरुवारी सकाळी १० वाजता महानगरपालिकेच्या मुख्य प्रांगणात महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते विधीवत गुढीपूजन करण्यात आले. यावेळी पारंपारिक पद्धतीने गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती सिंधुताई कोल्हे, सभागृह नेते नितीन लढ्ढा यांच्यासह भाजप गटनेते प्रकाश बालाणी, शिवसेना गटनेते विष्णू भंगाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते प्रफुल्ल देवकर आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापुरुषांना अभिवादन आणि परिसर स्वच्छता गुढी उभारल्यानंतर महापौरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. तसेच मनपा प्रांगणातील लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांच्या पुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांची विशेष स्वच्छता करण्यात आली असून, सर्वच ठिकाणी माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली आहे.भरगच्च उपस्थिती आणि सजावट या सोहळ्यासाठी संपूर्ण मनपा परिसर आकर्षक रांगोळ्यांनी सजवण्यात आला होता. कार्यक्रमाला नगरसेवक डॉ. विश्वनाथ खडके, ॲड. शुचिता हाडा, नितीन सपके, जयश्री पाटील, रेश्मा काळे, मंगला चौधरी, पूजा जगताप, रीटा सपकाळे, कलाबाई शिरसाळे, पियुष कोल्हे, गायत्री राणे, सुरेखा तायडे, विजय बांदल, कविता शिवदे, राजेंद्र घुगे पाटील, माधुरी बारी, निलेश तायडे, ऋतिक ढेकळे, रबियाबी खान यांसह मनपाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.तीन दिवस राहणार रोषणाई गुढीपाडवा ते महानगरपालिका स्थापना दिन असा दुहेरी उत्सव जळगावकर अनुभवणार आहेत. यानिमित्त १९ ते २१ मार्च या कालावधीत मनपा इमारत आणि शहरातील मुख्य चौकांमध्ये झगमगाटी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.”मराठी संस्कृतीचे जतन करणे आणि आपल्या महापुरुषांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. मनपाच्या इतिहासात हा सण पहिल्यांदाच अशा पद्धतीने साजरा होत असल्याचा आनंद आहे.”
— दीपमाला काळे, महापौर.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button