गुटखा माफिया सतीश जयस्वाल हा सरकारचा जावई आहे का? जालना येथे तब्बल 1 कोटी दोन लाख 11 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त
गुटखा माफिया सतीश जयस्वाल हा सरकारचा जावई आहे का जालना येथे तब्बल 1 कोटी दोन लाख 11 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्रात गुटखा बंद असताना गुटखा येतो कसा अन्न प्रशासन झोपले का असा सवाल जनता करीत आहे जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल प्रभारी पोलीस अधीक्षक आयुष नोमानी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव स्थानिक जालना पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी वेगवेगळे पथक बनवून त्या अनुषंगाने दिनांक 13/12/2024 रात्री 1 वाजेच्या सुमारास जालना हद्दीत कडवंंची शिवारात समृद्धी महामार्गावर स्थानिक गुन्हे शाखा पेट्रोलिंग करीत असताना त्यांना समृद्धी महामार्गावर मेहकर मार्गे संभाजीनगर कडे जाणारा संशयित कंटेनर थांबवून ड्रायव्हरला विचारपूस करीत असताना त्याने उडवा उडवी चे उत्तर दिले त्यामुळे संशय अधिक बळावला पथकातील पोलीस अंमलदार व त्यांचे साथी यांनी कंटेनर चे दार उघडायला सांगितले त्याने पळ काढण्यास सुरुवात केली त्याला लगेच पोलिसांनी आपली खाकी दाखवताच सगळी हकीगत सांगितली मानवी आरोग्यास घातक असलेले सुगंधी द्रव्य त्यावर प्रक्रिया करून रासायनिक प्रक्रिया केली जाते अन्न खाण्याच्या ऐवजी जास्त करून आजकाल तरुणांचा तोंडात गुटका दिसत आहे त्यामुळे गुटखा खाणाऱ्या मानवाचे जीवन पन्नास वर्षाच्या आत संपत आहे कंटेनर चालक इरफान रहीम सय्यद वय वर्ष 26 राहणार पुंडलिक नगर हुसेनी कॉलनी गल्ली नंबर 5 इतर दोन एकूण तीन आरोपींना जमा करण्यात आले आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोमांणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जालना योगेश उबाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस हवालदार सॅम्युअल कांबळे राम पोहरे प्रशांत लोखंडे सागर बाविस्कर योगेश सहाले धीरज भोसले सोपान क्षीरसागर चालक सौरभ मुळे सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी मोठी कामगिरी केली आहे