ताज्या बातम्या

पाचोरा नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये दिलेली आश्वासने हवेतच पाचोरा शहराला रोज पिण्याचे पाणी देणार पिण्याच्या पाण्याचा आज 7 दिवस// 7 दिवसात प्यायचे पाणी मिळत नसेल तर बोलण्याचा फायदा काय? नागरिक त्रस्त झाल्यामुळे नगरपालिकेच्या वेबसाईटवर कर्मचाऱ्यांना फोन कर्मचाऱ्यांनी दाखवली कारणे


गिरणा नदीत फुल भरून वाहत आहे गिरणा नदीत पाणी असून पाचोरा शहराला पाणीपुरवठा करणारे पिण्याचे KT वेअर तुडुंब भरलेले असून पिण्याचे पाणी नागरिकांना तब्बल 7 दिवसानंतर मिळत आहे मागच्या दोन आठवड्या पूर्वी पाचव्या दिवशी पिण्याचे पाणी मिळत होते आता तर 7 दिवस झाले तरीही पिण्याचे पाणी मिळाले नाही पाचोरा नागरिक संतप्त उन्हाळ्याच्या दिवसात कमीत कमी जी सिस्टीम सुरळीत होती ती सिस्टीम बिघडली त्या सिस्टीमला जबाबदार कोण? नुकत्याच नगरपालिकेच्या निवडणुका संपल्या निवडणुकीत निवडून येण्यासाठी नगराध्यक्ष नगरसेवक यांनी आश्वासने दिली ती हवेतच असा नागरिक सवाल करीत आहे अतिशय चुकीच्या पद्धतीचे नियोजन नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना विचारले असता त्यांनी सांगितले लाईट नव्हती दुसऱ्या कर्मचाऱ्याने सांगितले पाईपलाईन फुटली अशा अवस्थेला जबाबदार कोण? दोन आठवड्यापासून उन्हाची तीव्रता वाढली असून साहजिकच पिण्याच्या पाण्याचा वापर जास्त वाढतो याचा अंदाज नगरपालिका पाणी व्यवस्थापन वर्ग करतो कर्मचारी यांना फोन लावला तर ते फोनच उचलत नाही फोन उचलला तरी पाहिजे तसे व्यवस्थित बोलत नाही नियोजन करणारे नेमके करतात तरी काय? उन्हाळा लागला पाण्याची व्यवस्था पाण्याची नियोजन कसे करावे आणि नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा कसा होईल याचा अंदाज घ्यायला पाहिजे होता पाणी व्यवस्थापन पुरवठा विभाग यांनी तातडीने मीटिंग घेऊन पाचोरा नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न लवकर सोडवावा अशी नागरिकाकडून मागणी होत आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button