बुलढाणा | दि. 26 फेब्रुवारी 2026 शेतकरी पुत्र संतोष देठे पाटील यांची भारतीय किसान संघटनेच्या मीडिया आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती“जय जवान जय किसान” या घोषवाक्याने प्रेरित भारतीय किसान संगठन मध्ये बुलढाणा जिल्ह्यासाठी महत्त्वाची संघटनात्मक नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे आता शेतकऱ्यांचे आंदोलन शेतकऱ्यांनी करावे यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये नियुक्त्या सुरू झाल्या आहे

डोलारखेड (ता. शेगाव, जि. बुलढाणा) येथील संतोष धोंडू देठे पाटील यांची भारतीय किसान संघटनेच्या मीडिया आघाडी बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे शेतकरी संघटित झाले तर देशात शेतकऱ्यांच्या दैनंदिन अवस्थेला शह देता येईल ही नियुक्ती एक वर्ष कालावधीसाठी राहणार असल्याचे संघटनेतर्फे कळविण्यात आले ही नियुक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत बोरकर यांनी अधिकृत नियुक्तीपत्राद्वारे जाहीर केली. नियुक्तीपत्रावर राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र यादव यांचे मार्गदर्शन असल्याचे नमूद करण्यात आले आहे संघटनेच्या वतीने देठे पाटील यांनी शेतकरी, कामगार व सर्वसामान्यांच्या हिताच्या प्रश्नांवर सक्रिय भूमिका बजावावी, तसेच संघटनेची ध्येय-धोरणे प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे प्रदेशाध्यक्ष प्रशांत बोरकर यांनी सांगितले की, बुलढाणा जिल्ह्यात संघटनात्मक बळकटीसाठी मीडिया आघाडीची भूमिका महत्त्वाची राहणार असून देठे पाटील यांच्या नियुक्तीमुळे संघटनेचे कार्य अधिक गतिमान होईल असा विश्वास आहे संघटनेचे प्रांतीय कार्यालय नागझिरी रोड, रावेर (जि. जळगाव) येथे असून राष्ट्रीय कार्यालय नोएडा येथे कार्यरत आहे.देठे पाटील यांच्या नियुक्तीबद्दल जिल्ह्यातील शेतकरी व कार्यकर्त्यांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे










