ताज्या बातम्या

संमिश्र न्यूज जळगाव शहर महानगरपालिका जळगाव शहरात महापौर दीपमाला काळे यांनी आपला कारभार स्वीकारल्यानंतर प्रत्येक गोष्टीचा ॲक्शन मोड फॉलो अप आणि फिल्ड वर्क यामुळे जळगाव शहरात लवकरच बदल होणार असे संकेत समोर दिसत आहे दिनांक 26/2/2026 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त जळगाव शहरात महापालिकेतर्फे अभिवादन


जळगाव शहरात सतत निरंतर रोज कार्य करीत असलेल्या जळगावच्या महापौर दीपमाला काळे आणि उपमहापौर मनोज चौधरी अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर यांच्यासह महानगरपालिकेचे अनेक कर्मचारी शहरातील प्रत्येक गोष्टीचा फॉलोअप घेत असल्यामुळे जळगाव शहरात उर्वरित कामांना वेग आला आहे प्रत्येक बैठकीमध्ये वेगवेगळे विषय घेऊन पाणीपुरवठ्याची कामे मार्गी लावण्यासाठी अनेक उपाय योजना बैठकीत सकारात्मक परिणाम दिसून येत आहे पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी मांडल्यानंतर महापौर दीपमाला काळे यांनी पाण्याच्या समस्या पाणीपुरवठा विभागाला तत्काळ सोडवा असे आदेश दिले त्यानुसार पाणीपुरवठा विभागाने प्रभागातील अनेक प्रलंबित कामे पूर्ण केली आणि उर्वरित कामे पुढील दहा ते पंधरा दिवसात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले काही ठिकाणी कमी दाबाने पाणी मिळण्याच्या तक्रारी आल्या होत्या त्यासुद्धा लवकरच दूर होतील सांडपाणी लिकेज नवीन नळ जोडणी या विषयावर तक्रारी आल्यानंतर स्वतः पाहणी करून नागरिकांचे निराकरण करण्यात आले काही ठिकाणी प्रभागातील तांत्रिक कामे अद्याप प्रलंबित असून ती प्रगतीपथावर आहे या मध्ये गौरी हाईट आणि दौलत नगर मध्ये 300+110 मिलिमीटर क्रॉस कनेक्शन करण्यासाठी लागणाऱ्या एमएसटी बनवण्याची ऑर्डर देण्यात आली छत्रपती संभाजीनगर तसेच महादेव मंदिराजवळ एअर वॉल बसवण्याचे काम येत्या आठवड्यात होईल अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने महापौर दीपमाला काळे यांना सांगितली त्यानंतर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज जळगाव शहरात महानगरपालिकेतर्फे अभिवादन करण्यात आले महापौर दीपमाला काळे यांनी सकाळी स्वातंत्र्यवीर सावकार चौकात प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शोभाताई बाविस्कर उपायुक्त निर्मला गायकवाड माजी महापौर नितीन लड्डा नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य विशाल भोळे नगरसेविका आशा पाटील यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते त्यानंतर महानगरपालिकेच्या आवारात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेला हार माल्याअर्पण करण्यात आले यावेळी उपमहापौर मनोज चौधरी अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर यांच्या मनपाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते त्यानंतर महापौरांच्या निर्देशानुसार नगरसेवक डायरी प्रत्यक्ष प्रारंभ जळगाव शहरात सुरू प्रभागातील कामांमध्ये पारदर्शकता येऊन तक्रारीचे निवारण जलद गतीने होईल असा विश्वास महापौर दीपमाला काळे यांनी व्यक्त केला आरोग्य विभाग आरोग्यनिरीक्षकाकडे आपल्या प्रत्येक प्रभागातील कामांची माहिती नगरसेवकांनी द्यावी आणि त्यावर आरोग्य निरीक्षकांची स्वाक्षरी घेणे बंधनकारक राहील डायरीमध्ये केवळ सहीच नाही तर कामाच्या दर्जाबाबत नगरसेवकांचे अभिप्राय आणि सूचना नोंदवल्या जातील आरोग्य विभागाने दिवसभरात काय काम केले याचा थेट अहवाल लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रशासनासमोर येणार आहे अनेकदा प्रभागात काम होत नसल्याच्या तक्रारी नगरसेवकाकडून केल्या जात आहे तर दुसरीकडे प्रशासनाकडून काम पूर्ण झाल्याचा दावा केला जातो त्यामुळे नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नगरसेवक डायरी एक महत्त्वाचा दुवा ठरणार


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button