जिल्हा जळगाव तालुका पाचोरा लोहारा येथे दत्त जयंतीचा सालाबादप्रमाणे सुरुवात जामनेर पाचोरा तालुक्यातील मातबगरांची हजेरी लागणार हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक
लोहारा येथे दत्त जयंतीला यात्रोत्सव भव्य कुस्त्यांची दंगल लोहारा ता पाचोरा—येथील हिंदू-मुस्लिम ऐक्यतेचे प्रतिक असलेल्या व सुमारे २०० वर्षांची परंपरा असलेल्या शहादावलशहा बाबांची यात्रा दि. १५डिसेंबर रविवार रोजी श्रीदत्त पौर्णिमा च्या दिवशी असून या यात्रेनिमित्त लोहारा येथील ग्रामस्थ व मंडळाने सालाबादाप्रमाणे भव्य कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे या वेळी कुस्त्यांच्या दंगलीचे आखाडा पूजन महाराष्ट्र राज्याचे मंत्री व संकट मोचक ना गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे तर यावेळी भाजपा नेते जे के चव्हाण माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम सोनजी पाटील संजय शांताराम पाटील भाजपा नेते अमोल शिंदे लोहारा गटाचे पालक पदा धिकारी सुहास पाटील ग्राम पंचायत सदस्य कैलास चौधरी माजी पंचायत समिती उपसभापती अनिताबाई चौधरी संजय दादा गरुड डॉ. सागर गरुड ज्येष्ठ कार्यकर्ते शरद सोनार माजी सेल्स टॅक्स अधिकारी ईश्वर शिंदे सुरेश चौधरी यांसह मान्यवरांची विशेष उपस्थिती राहणार आहे कुस्त्या दुपारी १२ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत होणार आहे कुस्त्यांची परिसरासह नाशिक मालेगाव धुळे सिल्लोड सोयगाव फत्तेपुरसह मराठवाड्यातील अनेक नामांकीत पहेलवान भाग घेतात जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त पैलवानांनी भाग घ्यावा तसेच जोड पाहून इनाम दिला जाईल असे आयोजन समितीचे नथ्थु गीते भगवान हटकर दीपक चौधरी रमेश कोळी संतोष गुजर कामा पहेलवान शेनफडू कोळी(नेरीकर) शेख हसन, अशोक लिंगायत राजू लिंगायत यासह ग्रामस्थ मंडळाने केले आहे पाचोरा रस्त्यावर प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ शाहादावल शाह बाबांचा जागृत दर्गा असून बाबांच्या नावाने येथे दरवर्षी यात्रा भरत असते येथील शिंदे परिवाराचे सदस्य बाबांची नियमित सेवा करीत असतात यात्रेच्या दिवशी सायंकाळी गावातून वाजत गाजत संदल चढविला जातो यावेळी भक्त बाबांच्या दर्ग्यावर नवस फेडतात यावेळी बाबांना प्रसाद म्हणून न्याज(गोडभात)दिला जातो.यावेळी यात्रोत्सवात विविध प्रकारची पाळणे झुले खेळणीची दुकाने हॉटेल्स जनरल कटलरी कापड भांडी दुकाने विविध खाद्यपदार्थ ची दुकाने आलेली असतात.यात्रोत्सवाला म्हसास कासमपुरा, शहापुरा, कुऱ्हाड कळमसरा सह परिसरातून भाविक येत असतात फोटो—येथील शहादावलशाह बाबांचा जागृत दर्गा व भगत रामधन शिंदे