ताज्या बातम्या

शेतकरी पुत्रांनी केली महत्त्वपूर्ण कामगिरी 30 वर्षांपासून बंद व.सा.का.च्या नवनिर्माणचा लढा निर्णायक वळणावर! …फेब्रुवारीत शेतकरी कामगार हितार्थ गोड बातमी मिळण्याची शक्यता!आपल्या युगपुरुष व.सा.का.च्या लढ्याला जवळपास २ वर्ष पूर्ण होत आहेत.


30 वर्षांपासून बंद व.सा.का.च्या नवनिर्माणचा लढा निर्णायक वळणावर! …फेब्रुवारीत शेतकरी कामगार हितार्थ गोड बातमी मिळण्याची शक्यता!आपल्या युगपुरुष व.सा.का.च्या लढ्याला जवळपास २ वर्ष पूर्ण होत आहेत. आपण कासवाच्या गतीने सुरू केलेल्या कामाने आज व्यापक स्वरुप धारण केले आहे थोडक्यात आपण सर्वांच्या वेळोवेळीच्या प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष मदत व सहकार्यातूनच आपण आज हे यश संपादन केलेले आहे.आपल्या एकप्रकारे अपघाताने गेल्या ३० वर्षांपूर्वी बंद झालेल्या व.सा.का.मुळे कार्यक्षेत्रातील शेतकरी व कामगार बांधवांनी गेल्या ३० वर्षात जे अतोनात हाल, अपेष्टा सहन केल्यात; त्याची पुर्णतः नव्हे तर अंशतः का असेना भरपाई म्हणून आपल्या व.सा.का.कार्यक्षेत्राला आपल्याच मायबाप शासनाच्या मदतीने आधुनिक जपान बनविण्याचे स्वप्न घेवून मी आपल्या या कामाला सुरुवात केली. माझ्या आयुष्यात अमेरीकेचे मा.राष्ट्रपती सर अब्राहम लिंकन नेहमी आदर्श राहिले आहेत. From log cabin to white house, असा त्यांचा ऐतिहासिक प्रवास!आपल्या या युगपुरुष व.सा.का. च्या प्रवासाला यावर्षी सर्वांच्या वेळोवेळीच्या सहकार्यांने विशेष गती मिळाली. त्यामुळे आपण वेळोवेळी शासनाचे आपल्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी लहान – मोठी आंदोलनेही केलीत; परिणामी आपल्या जळगांव जिल्ह्यातील लोकप्रतिनीधींना विविध प्रसार माध्यमातून व आपण घेतलेल्या भेटीगाठीतून आपला विषय समजलाही. आज व.सा.का. कार्यक्षेत्रातील सर्वच सत्ताधारी व विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधी व आपल्या जळगांव जिल्ह्यातील मंत्री महोदय आपल्या व.सा.का.ला शासनाकडून थकहमीरुपी मदत मिळवून देण्यासाठी सकारात्मक आहेत. हे देखील आपल्यासाठी मोठे यशच आहे या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून आपल्याला राजगड प्रमाणे थकहमीचा विषय मार्गी लावण्यासाठी आपण वरील सर्वांच्या सहकार्याने या फेब्रुवारी महिन्यात प्रयत्नशील आहोत. माहितीसाठी धन्यवाद


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button