ताज्या बातम्या

लोकशाहीत दिवसाढवळ्या पत्रकारितेचा? खून/ यंत्रणा कोणासाठी काम करत आहे? पत्रकारितेची अभिव्यक्ती आणि सुरक्षा फक्त नावापुरतीच का? चौथ्या आधारस्तंभाचा अपमान MTS24News धडक बेधडक संपादक महेंद्र सूर्यवंशी चाळीसगावात गुन्हेगारांचे तांडव! पोलिसाचा खून, भाजप नगरसेवकाची हत्या आणि आता पत्रकाराचा ‘डेटा’ गायब करण्यासाठी मोबाईलची लूट


MTS24News धडक बेधडक संपादक महेंद्र सूर्यवंशी​चाळीसगाव (विशेष प्रतिनिधी): चाळीसगाव शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचे अक्षरश: वाभाडे निघाले आहेत. भरदिवसा घडणाऱ्या हत्यांच्या सत्राने शहर हादरलेले असतानाच, आता लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना टार्गेट केले जात आहे. पोलीस स्टेशनच्या आवारात पत्रकारावर हल्ला करून, त्यांचा महत्त्वाचा गुप्त डेटा असलेला मोबाईल बळजबरीने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे शहरात ‘जनता सुरक्षित राहणार का?’ हा सवाल आता उग्र रूप धारण करत आहे.​डेटा चोरीसाठी पत्रकारावर हल्ला आणि लूट मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा पर्दाफाश करणाऱ्या एका पत्रकारावर पोलीस स्टेशनच्या अगदी बाहेर दबा धरून बसलेल्या गुंडांनी हल्ला केला. केवळ मारहाण करून न थांबता, हल्लेखोरांनी पत्रकाराचा मोबाईल बळजबरीने हिसकावून पळ काढला. या मोबाईलमध्ये अनेक गुन्ह्यांशी संबंधित ‘गुप्त डेटा’ आणि महत्त्वाचे पुरावे होते. हे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशानेच हा नियोजनबद्ध कट रचून मोबाईल चोरण्यात आल्याचा खळबळजनक आरोप होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पीडित पत्रकाराला न्याय देण्याऐवजी त्यांच्यावरच खोटा गुन्हा दाखल करून प्रशासनाने आपली पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न केला आहे. खाकी आणि खादीवरही वार! शहरात गुन्हेगारांची मजल इतकी वाढली आहे की, त्यांनी आता थेट पोलिसांवर आणि लोकप्रतिनिधींवर हात टाकण्यास सुरुवात केली आहे.​मुंबई पोलीस जवानाचा खून: भरदिवसा एका पोलीस जवानाची हत्या करून गुन्हेगारांनी पोलिसांच्या वर्दीलाच आव्हान दिले आहे.भाजप नगरसेवकाची हत्या: भरवस्तीत भाजपच्या नगरसेवकाचा निर्घृण खून करण्यात आला, तर दुसऱ्या एका नगरसेवकावर जीवघेणा हल्ला झाला. सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी आणि रक्षकच जर सुरक्षित नसतील, तर सामान्य माणसाने कुणाकडे पाहायचे?पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह पोलीस स्टेशनच्या दारात पत्रकाराचा मोबाईल लुटला जातो आणि पोलीस बघ्याची भूमिका घेतात, यावरून गुन्हेगारांना कोणाचे अभय मिळत आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गुन्हेगारीचे धागेदोरे उघड करणारा डेटा गायब करण्यासाठी हे कृत्य केल्याचे स्पष्ट दिसत असून, यामुळे पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जनतेचा संताप: “हा तर गुंडाराज!” शहरातील या घटनांमुळे व्यापारी आणि नागरिक दहशतीत आहेत. भरदिवसा होणारे खून आणि लूटमारीच्या घटनांमुळे चाळीसगाव हे गुन्हेगारांचे नंदनवन झाले आहे का? अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. या प्रकरणातील दोषींवर आणि पत्रकाराचा मोबाईल पळवून नेणाऱ्या गुंडांवर तातडीने कारवाई न झाल्यास अवैध धदे विरोधात तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा आखिर भारतीय भष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व ब्रिक्स ह्युमन राइट्स तर्फे देण्यात आला आहे.






Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button