ताज्या बातम्या

संमिश्र लाचखोर आरटीओ अधिकाऱ्याला पदोन्नती कोट्यावधी रुपयाची संपत्ती सापडूनही पायघड्या परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण मी 3 महिन्यापूर्वी परिवहन विभागाचा कारभार स्वीकारला यापूर्वी ज्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला त्यांची बदली छत्रपती संभाजी नगर आरटीओच्या नावे मागितली लाच स्वीकारण्याला अहिल्यानगर लाच लुचपत विभागाकडून अटक


पुणे तेथे काय उणे कोट्यावधी रुपयाची मालमत्ता सापडूनही लाचखोर आरटीओला पदोन्नती परिवहन विभागाचे लाचखोर आरटीओ अधिकारी पदोन्नतीचे संकेत मिळाले राज्यातील 40 सहाय्यक प्रादेशिक परिवहन महामंडळात उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना प्रादेशिक परिवहन अधिकारी या पदी पदोन्नती देण्यात आली दिनांक 9/2/2026 रोजी अधिसूचना प्राप्त झाली असून यात राजेंद्र केसकर यांना सुद्धा सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याचा समावेश करण्यात आला आहे केसकर यांना गोंदिया येथे आरटीओ कार्यालयात 70 हजार रुपयांची लाच लुचपत नागपूर विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगे हात पकडले त्यानंतर पुणे येथे त्यांच्या घरावर नागपूरच्या लाच लुपत विभागाने धाड टाकल्यानंतर मोठ्या प्रमाणावर संपत्ती आढळून आली रोख रक्कम सोने चांदी सह 4 कोटी 25 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तरीही अशा अधिकाऱ्याला परिवहन विभागाने पदोन्नती केली याची आश्चर्य वाटत आहे यामुळे प्रशासन व आरटीओ परिवहन विभागाच्या पारदर्शक कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले पश्चिम बंगाल तेथून खरेदी करण्यात आलेला जेसीबी वाहनाच्या नोंदणी करता राजेंद्र केसकर यांनी तक्रारदाराकडून 70 हजार रुपयांची लाचेची मागणी केली त्याप्रकरणी नागपूरच्या लाच लुजपत विभागाने सापळा रचून राजेंद्र केसकर यांना अटक केली ही कार्यवाही दीड महिन्यापूर्वी झाली या प्रकरणाचा अद्याप तपासात सुरू आहे कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल असताना जोपर्यंत गुन्ह्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत त्याला पदोन्नती दिली जात नाही असा शासकीय नियम आहे असे असताना संविधान विरोधी कार्यक्रम सुरू आहे अशा परिस्थितीतही केसकर यांना उप प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून नियुक्ती कोणत्या नियमाद्वारे केली असा सवाल जनता करीत आहे विशेष म्हणजे हा सरकारचा जावई आहे का? केसकर याच्यावर गुन्हा दाखल असताना त्याच्या सेवा पुस्तिकेचा या गुन्ह्यात उल्लेख नाही आता तीन महिन्यानंतर नवीन आलेले उपसचिव परिवहन विभाग मुंबई चेतन निकम यांनी स्पष्ट सांगितले की माझ्या काळात ही घटना घडलेली नाही जबाबदार कोण? कार्यवाही कधी करणार अनेक जणांनी तक्रार अर्ज देऊनही केसकर यांना पदोन्नती का देत आहे याचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे त्यानंतर छत्रपती संभाजी नगर ट्रान्सपोर्ट वाहनांची वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रति ट्रेलर 3500 अशी एकूण 21 हजाराची लाज मागणाऱ्या आरटीओ एजंट साहिल उर्फ भीमराव लक्ष्मण पवार वय 21 वर्ष राहणार शिवाजीनगर पुणे याला अहिल्यानगर च्या लाच लुचपत विभागाने कर्णपुरा मैदानावर लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली दिनांक 9/2/2026 रोजी ही कार्यवाही करण्यात आली


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button