पत्नी सासरवाडीच्या छळात अभियंत्याची आत्महत्या न्यायाधीशांवर लांचेचे आरोप न्यायव्यवस्थेत बदल होऊनही लोकशाहीत कायद्याचा गैरवापर

पत्नी सासरवाडीच्या छळात अभियंत्याची आत्महत्या न्यायाधीशांवर लांचेचे आरोप कर्नाटक राज्यातील बंगळूर येथील घटना एक तासात व्हिडिओ 24 पानी सुसाईड नोट जजने सेटलमेंट साठी मागितली लाच सासू म्हणाली तू आतापर्यंत आत्महत्या केली नाहीस अनेक चित्र विचित्र घटना समोर येत आहे पैशासाठी कोण काय करेल त्याचा भरोसा नाही 34 वर्षाचा सॉफ्ट इंजिनियर अतुल सुभाषची 24 पानी सुसाईड नोट व्हिडिओ पुरेसा आहे कौटुंबिक कलह व कायदेशीर लढाईमुळे मानसिक छळ होत असल्याची व्यथा व्यक्त करत आत्महत्या केली यासाठी पत्नी निकिता सिंघानिया सासू भाऊजई चुलत सासरे यांना जबाबदार धरण्यात आले आहे सोमवारी पोलीस अतुलच्या खोलीत पोहोचले तेव्हा मृतदेहाजवळ सुसाईड नोट असलेले कागदपत्र मिळाले व फलकावर लिहिले होते न्यायप्रवलंबित न्यायव्यवस्थेतेतील कथित भ्रष्टाचार व शेवटची इच्छा सुसाईड नोट मध्ये लिहिली होती यावर काही मुद्दे मी अतुल सुभाष उत्तर प्रदेशचा असून एका सॉफ्टवेअर कंपनीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स डीजीएम आहे 2019 मध्ये लग्न झाले पत्नी निकिता सिंघानिया सुद्धा सॉफ्टवेअर अभियंता आहे लग्नानंतर निकिता आणि तिचे कुटुंबीय माझ्याकडे पैसे उकळण्यासाठी दबाव टाकत होते पैसे न दिल्यामुळे 9 गुन्हे दाखल केले 120 सुनावणी झाल्या आणि मी 40 वेळा बेंगलोर हून जोनपुर कोर्टात गेलो वर्षभरात केवळ 22 सुट्ट्या मिळतात ते मी कसे हाताळले असेल आपण समजू शकतात प्रकरण मिटवण्यासाठी न्यायाधीशांकडून 3 कोटी रुपयांचा दबाव टाकण्यात आला 5 लाख रुपयाची मागणी केली प्रत्येक सुनावणीत मला लाच द्यावी लागली मी तोडगा काढण्यास नकार दिला त्यामुळे न्यायाधीशांनी मला माझी बाजू मांडण्यासाठी संधी दिली नाही संधी न देता 16 पानी आदेश काढण्यात आला त्या आदेशात पत्नीला 80 हजार रुपये महिना द्या पत्नीने छळ लावला प्रत्येक कार्यक्रमात जायचं ठरलं तर 6 साड्या सोन्याचा प्रत्येक वेळेस नवीन सेट मागायची सासूबाईंना वीस लाखापेक्षा जास्त पैसे दिले ते पण परत केले नाही कायद्याची कमजोरी न्यायव्यवस्थेत बदल होऊनही आजही चांगले चांगले लोक कायद्याचा गैरवापर करीत आहे माझी शेवटची इच्छा माझ्या सर्व खटल्यांचे थेट ऑनलाईन प्रक्षेपण व्हावे त्यामुळे माझ्यासारखे असे इंजिनियर किंवा ज्यांना असा त्रास होत असेल तो तरी वाचेल जनतेला समजू द्या न्यायव्यवस्था कशी आहे? माझी सर्व प्रकरणे कर्नाटक कोर्टात दाखल करावी मुलाला कोर्टात आणू नका माझ्या पत्नीला व तिच्या कुटुंबीयांना माझ्या मृतदेहाजवळ येऊ देऊ नका माझ्यावर अत्याचार करणाऱ्या शिक्षा होईल तोपर्यंत अस्थिकलशाचे विसर्जन करू नका भ्रष्ट न्यायाधीश पत्नी व तिच्या कुटुंबीयांना मुक्त केले तर माझी राख न्यायालयाबाहेर गटारात फेकून द्या किती हृदय द्रावक घटना काय ते न्यायालय काय तो न्याय अक्षरशा लोकशाहीला काळीमा फासणारा प्रकार भारतात होत आहे माणसासारखे माणसं मरत आहे कुठे गेली न्यायव्यवस्था?


