राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद शिंदाड येथील 1018 अंगणवाडी इमारत असुरक्षित अयोग्य व नियमबाह्य ठिकाणी बांधण्यात येत असुन सदर बांधकाम तत्काळ थांबवून अंगणवाडी योग्य व सुरक्षित जागेवर स्थलांतरीत करण्याबाबत मा. उपविभागीय अधिकारी मा.गटविकास अधिकारी यांना आदिवासी एकता परिषद पाचोरा तर्फे निवेदन…

मौजे शिंदाड ता. पाचोरा येथील वार्ड क्र. 5 मध्ये अंगणवाडी क्र. 1018 ची इमारत संध्या ज्या ठिकाणी बांधण्यात येत आहे. ती जागा ही सुरक्षिततेच्या दृष्टीने पुर्णत: अयोग्य, असुरक्षित व शासनाच्या अंगणवाडी बांधकामाच्या मार्गदर्शक सुचनांच्या विरोधात आहे. तरी सदर जागेबाबत खालील गंभीर बाबी निदर्शनास येत आहे. सदर जागा ही नदी पात्राला लागून अपघात प्रणव परिसरात असुन लहान मुलांच्या जिवीतास धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. सध्या स्थितीला ज्या जागेवरती बांधकाम करण्यात येत आहे, त्या जागेचा गेल्या वर्षी आलेल्या पुरामुळे सदर जागा ही अपघातग्रस्थ म्हणून घोषीत करण्यात आलेली असून सदर जागेच्या प्रशासनाने पंचनामा देखील करण्यात आलेला आहे. त्यामुळे बांधकाम सुरु असलेल्या अंगणवाडीचे बांधकाम हे लोक वस्तीपासुन 400 ते 500 मीटर लांब असुन त्यामुळे पावसाळ्यात पाणी साचणे, स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीने अयोग्य परिस्थिती निर्माण होणे निश्चित आहे.तसेच गर्भवती महिला, स्तनदा माता व बालकांसाठी सुरक्षित प्रवेश व निर्गमनाची कोणतीही खात्री नाही. त्यामुळे सदर ठिकाणी अंगणवाडी चालवणे हे बालहक्क, सुरक्षिततेचा हक्क व शासनाच्या बाल कल्याण धोरणाचा भंग करणारे आहे. तसेच गेल्या महीन्यात पाचोरा तालुक्याला लागूणच असलेल्या भडगाव येथे शाळेची इमारत हे नदीला लागून असल्याने तेथे देखील लहान मुलांना आपला जीव गमवावा लागल्याची दुदैवी घटना ताजी असतांना दुसरी घटना घडण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन केल्याचे शक्यता नाकारता येऊ शकत नाही. अंगणवाडी ही केवळ इमारत नसुन ती लहान बालकांच्या पोषण, शिक्षण व सुरक्षितेशी थेट संबंधीत सार्वजनिक संस्था आहे. त्यामुळे अशा ठिकाणी नियमबाह्य व धोकादायक पध्दतीने बांधकाम करणे हे प्रशासनाच्या कर्तव्यच्यतिस समक्ष ठरते.तरी आपणास निवेदन आहे की, मौजे शिंदाड येथील वार्ड क्र. 5 मध्ये सदर इमारत सुरक्षित ठिकाणी बांधण्यासाठी पर्याप्त शासकीय जागा उपलब्ध आहे. तरी सदर अंगणवाडी बांधकामाचे तात्काळ अधिकृत पाहणी करण्यात यावी. सदर जागेवरील बांधकाम त्वरीत थांबविण्याचे आदेश देण्यात यावे. अंगणवाडी इमारत ही वस्तीतील मध्यवर्ती, सुरक्षित , सार्वजनिक व नियमानुसार योग्य जागेवर स्थलांतरीत करुनच बांधण्यात यावी. संबंधीत अधिकारी/कंट्राकदार यांची जबाबदारी निश्चित करुन आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी.सदर निवेदनाची दखल न घेतल्यास राष्ट्रीय आदिवासी एकता परीषद पाचोरा तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.असा इशारा देखील निवेदनच्या माध्यमातून देण्यात आला आहे. यावेळी जिल्हा अध्यक्ष गफूरभाऊ तडवी, तालुका अध्यक्ष जलालभाऊ तडवी, भारतीय बेरोजगार मोर्चा जिल्हा अध्यक्ष नंदलालदादा आगारे, बहुजन मुक्ती पार्टी युवा जिल्हा अध्यक्ष विनोदभाऊ अडकमोल, शारुख तडवी, मुकेश तडवी,संजय तडवी,आरिफ तडवी,समीर तडवी अजय तडवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते










