जिल्हा जळगाव तालुका पाचोरा सकल बंजारा समाजाच्या वतीने राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांचा इतिहास शाळेत शिकवला जावा आणि विद्यार्थ्यांना राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांचे जीवन चरित्र यावर एक पुस्तक आणि त्यांचा इतिहास शाळेत शिकवला पाहिजे यासाठी पाचोरा तहसीलदार सो: प्रांत अधिकारी सो; गट शिक्षणाधिकारी सो: यांना बंजारा समाजाच्या वतीने निवेदन दिले

जिल्हा जळगाव तालुका पाचोरा सकल बंजारा समाजाच्या वतीने राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांचा इतिहास शाळेत शिकवला जावा आणि विद्यार्थ्यांना राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांचे जीवन चरित्र यावर एक पुस्तक आणि त्यांचा इतिहास शाळेत शिकवला पाहिजे यासाठी पाचोरा तहसीलदार सो प्रांत अधिकारी सो गटशिक्षणाधिकारी सो यांना बंजारा समाजाच्या वतीने निवेदन दिले राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांचा इतिहास विद्यार्थ्यांना सांगावा यासाठी सकल बंजारा समाजाच्या वतीने शेकडो सहयांचे निवेदन देण्यात आले .
संत सेवालाल महाराज यांच्या इतिहासावर लिहिलेली संदर्भ साधने पुस्तके यांची उपलब्धता कमी असल्यामुळे त्यांच्या इतिहासाची जास्त माहिती स्तोत्र उपलब्ध नाही .
प्राथमिक शिक्षक असलेले किसन सूर्यवंशी यांनी संत सेवालाल महाराजांच्या इतिहासाची सत्य मांडणी केली आहे ,त्याचा संदर्भ ग्रंथ म्हणून वापर करावा व तो इतिहास शाळा कॉलेजेस मध्ये सांगितला जावा या मागण्याचे निवेदन सकल बंजारा समाजाच्या वतीने देण्यात आले आहे.या निवेदनावर पाचोरा तालुक्यातील अनेक तांड्यामधील मा: कै; मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी अनेक आश्रम शाळा कॉलेज माध्यमिक शाळा सुरू केल्या त्यांच्या काळात अनेक बंजारा समाजाचे सरकारी नोकरीवर पोलीस भरती उच्च अधिकारी झाले बंजारा समाजातील शिकलेले अनेक जण सरकारी नोकरीवर आहे आता ज्या आश्रम शाळा सुरू आहेत त्यांची पटसंख्या पाहिजे त्या प्रमाणात नसून अनेक ठिकाणी आश्रम शाळेच्या चौकशी झाली पाहिजे मुलांना निकसं अन्न देत असतात मुलांच्या शालेय पोषणाच्या आहारामध्ये घोटाळा करतात आश्रम शाळेतील मुलांना नीट शिकवत नाही त्यांची परिस्थिती मी स्वतः जाऊन पाहिली त्यांना राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांनी काय कार्य केले असा प्रश्न त्या आश्रम शाळेतील मुलांना विचारलं तर _ काहीच येत नाही आश्रम शाळेत चेअरमन मुख्याध्यापक यांची मुले त्या शाळेत शिकताना मी कधीच पाहिले नाही तर कै; मा; मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी जी शिकवण दिली त्या शिकवणीवर आज जे सरकारी अधिकारी सरकारी नोकरीवर आहेत त्यांच्या डोक्यात हा प्रकाश पडेल का? समाजाला आपल्याबरोबर हक्क अधिकार देण्यासाठी मा कै; मुख्यमंत्री वसंतराव नाईक फार मोठा लढा दिला आणि ते दीर्घकाळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांच्यामुळे आज बंजारा समाजाला फार मोठी चालना मिळाली परंतु काही बंजारा समाजातील लोकांनी स्वतःचा फायदा केला आणि समाजातील पीडित शोषित अशिक्षित वर्ग याकडे दुर्लक्ष केले आज उच्च शिक्षण घेतलेल्या सरकारी नोकरीवर असलेल्या बंजारा समाजाच्या लोकांनी समाजाला किती प्रेरित केले हे आपण प्रत्यक्ष त्यांच्या तांड्यावर त्यांच्या वस्तीवर जाऊन पाहू शकता पत्रकार गेले अनेक प्रश्न त्यांना विचारतात पण ते पत्रकारांना समाजाची भीती दाखवतात तर मग कशाकरता सरकारी योजनेचा फायदा स्वतःसाठी घेतात तुम्हाला सरकारने मुले शिकवण्यासाठी त्यांना व्यवस्थित आहार देण्यासाठी पगार देत आहे हे लक्षात ठेवा









