ताज्या बातम्या

दैनिक वृत्तपत्र व साप्ताहिक वृत्तपत्र जळगाव जि धुळे जि नाशिक जि नंदुरबार महाराष्ट्र राज्यातील दैनिक वृत्तपत्र चायनल NEWS CITY 85 शासनाच्या// जागेवर अवैध अतिक्रमण केल्या प्रकरणी उपसरपंच पदावरून पाय उतार जळगाव जि पारोळा तालुक्यातील पिंपरी मोंढाळे येथील शासकीय गायरान जमीनीवर आणि ग्राम पंचायत मालकीच्या रस्ता व राजमार्गाच्या जागेवर अनाधिकृत सिमेंट काँक्रीटचे दुमजली ईमारत बांधकाम


जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील पिंपरी मोंढाळे येथील शासकीय गायरान जमीन वर आणि ग्रामपंचायत मालकीच्या रस्ता व राजमार्ग च्या जागेवर अनाधिकृत सिमेंट काँक्रीटचे दुमजली ईमारत बांधकाम करून अतिक्रमण करणाऱ्या पिंपरी मोंढाळे येथील उपसरपंच पुष्पा रामकृष्ण पाटील चे ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच पदावरून हकालपट्टी!शासनाच्या बेघर सनदेच्या लाभार्थी यादीतील समान नावाचा दुरपयोग करून दुसऱ्या बाप आपला बाप दाखवून शासकीय राजमार्ग ची जमीन परस्पर ग्रामपंचायत दप्तरी गाव नमुना नंबर 08 वर बेकायदेशीर लावून शासकीय दप्तरात खाडाखोड करून फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे नाशिक विभागीय आयुक्त तथापि अप्पर आयुक्त अजय मोरे साहेब यांच्या आदेशाने उपसरपंच पुष्पा रामकृष्ण पाटील हिच्या पतीचे सरकारी जागेवर अतिक्रमण सिद्ध झाल्याने ग्रामपंचायत सदस्य पदावरून व उपसरपंच पदावरून हकालपट्टी सविस्तर माहिती येणे प्रमाणे जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील पिंपरी मोंढाळे येथील ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते गुलाबराव जगन्नाथ पाटील यांनी पारोळा तालुक्यातील पिंपरी मोंढाळे येथील ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक सन. 2020 ते 2025 कालावधीत निवडून आलेल्या महिला ग्रामपंचायत सदस्यां व उपसरपंच पुष्पा रामकृष्ण पाटील यांनी तसेच तिच्या पती रामकृष्ण गंभीर पाटील आणितिचा सासरा गंभीर नथु पाटील व जेठ अनिल गंभीर पाटील इ. भुमाफियानी आपल्या घरात उपसरपंच असल्याने पदाचा गैरवापर करून पिंपरी मोंढाळे येथील ग्रामपंचायत घर. क. 155 च्या पश्चिमेस व उतरेस व पूर्व या तिन्ही बाजूंनी खालच्या मजला 600 चमी. आणि वरचा मजला 600चौ.मी. शासनाच्या मालकीची जागेवर व ग्रामपंचायत रस्ता व राजमार्ग वर बेकायदेशीर सिमेंट काँक्रीटचे बांधकाम पूर्ण अतिक्रमण केलेल्या बाबत जळगाव जिल्हाधिकारी व दंडाधिकारी यांच्या कडे दि 22/09/2022 रोजी लेखी तक्रार दाखल करण्यात आली होती सदर तक्रार अर्जावर विवाद अर्ज 146/2023 प्रकरणात जिल्हाधिकारी जळगाव यांनी चौकशी व पंचनामा करून अहवाल सादर करणे बाबतीत मा गटविकास अधिकारी पंचायत समिती पारोळा आदेशीत केले होते तदनंतर गट विकास अधिकारी पारोळा यांनी दिनांक 18/01/2023 ते दि 10/03/2023 पावेतो विस्तार अधिकारी व ग्रामसेवक ई. यांनी या सबधित सखोल चौकशी करून स्थळ निरीक्षण पंचनामा करून ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच पुष्पा रामकृष्ण पाटील यांनी व तिच्या पतीने ग्रामपंचायत घर क्रमांक 155 चे मुळ जागा 29×22 एकुण 638 असतांना घराच्या तिन्ही बाजूने मोठ्या प्रमाणावर म्हणजे 47×26 एकुण 1222 खालचा मजला व वरचा मजला 1222 असे वाढीव अनधिकृतरित्या पक्के सिमेंट काँक्रिट चे बांधकाम करून दुमदली इमारत बेकादेशीर अतिक्रमण सिद्ध झाले आहे असा सरकारी चौकशी अहवाल व सखोल चौकशी अहवाल पुरावा सह गटविकास अधिकारी पारोळा यांनी दिनांक. 28/03/2023 रोजी उपमुख्य कार्यकारीअधिकारी जिल्हा परिषद जळगाव ग्रामपंचायत विभाग यांना सादर केलेला होता त्यानंतर दाखल अहवाल व सर्व पंचनामा व स्थळ निरिक्षण पंचनामा ची सखोल शहानिशा तसेच उपसरपंच पुष्पा रामकृष्ण पाटील हिच्यावर तात्काळ सदस्य अपात्र ची पुढील कार्यवाही व कारवाई तात्काळ करणे आवश्यक आहे मत मांडुन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांनी दिनांक 11/04/2023 रोजी मा. जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे कोर्टात विवाद अर्ज क्रमांक. 146/2023 मध्ये सादर केलेला होता तसेच श्री रामकृष्ण गंभीर पाटील व गंभीर नथु पाटील व अनिल गंभीर पाटील ई. यांनी उपसरपंच पदाचा गैरवापर करून बेकायदेशीर गायरान जमीन सर्वे नंबर 84 यांच्यावर मोठ्या प्रमाणावर 2 एकर जागेवर पत्री शेडचे बांधकाम करून अतिक्रमण केलेले आहे याबाबत मा. जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे गुलाबराव जगन्नाथ पाटील यांनी कायदेशीर तक्रार दाखल केलेली होती त्या दाखल तक्रारीवर पुष्पा रामकृष्ण पाटील यांनी दुसरया लोकांची सनद चोरून सनदे वरिल समान नावाच्या व्यक्ती खोटा दावा केला होता तसेच जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात खोटे शपथ पत्र व खोटे दाखले सादर करून कोर्टाची दिशाभूल करून कोर्टाचा अमुल्य वेळ वाया घातला तसेच खोटे कागदपत्रे व इतर पुरावे ग्रामसेवक वासुदेव हरिभाऊ मारवडकर व पारोळा गट विकास अधिकारी किशोर शिंदे आणि पिंपरी ग्रामपंचायत रोजगार सेवक राजेन्द्र आनंदा विसावे तसेच पिंपरी मोंढाळे वि. का. सोसायटी चेअरमन राजेन्द्र शालिक पाटील व ग्रामपंचायत शिपाई गोकुळ ओंकार विसावे तसेच विस्तार अधिकारी राजेश धोंडू इंगळे व सुनील अमरूत पाटील गणेश प्रभाकर पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य वैशाली प्रमोद पाटील तसेच उपसरपंच पती रामकृष्ण गंभीर पाटील तसेच तंटामुक्त समिती अध्यक्ष व वाळु माफिया प्रमोद रामलाल पाटील इ. .भषट लोकांनी पुरवनियोजीत संगनमताने खोटे कागदपत्रे व खोटे अहवाल सादर करून खोटे शपथ पत्र सादर करून जिल्हाधिकारी जळगाव यांच्या कोर्टाची दिशाभूल करीत वेळ वाया घातलेला आहे गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्हाधिकारी सो. यांच्या कोर्टात शेकडो पुरावे अहवाल सादर करून ही एक तर्फी बाजू ऐकून जळगाव जिल्हाधिकारी यांनी बेकायदेशीर आदेश पारित केलेला होता जळगाव जिल्हाधिकारी यांच्या आदेशा विरुद्ध सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य गुलाबराव जगन्नाथ पाटील यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्या बेकायदेशीर आदेशा विरुद्ध मा. अप्पर आयुक्त नाशिक येथील अजय मोरे साहेब यांच्याकडे अपील दाखल केलेले होते सदर अपील मध्ये गुलाबराव जगन्नाथ पाटील यांनी अपिलात सखोल पुरावे अनेक शासकीय चौकशी अहवाल व लेखी युक्तीवाद सादर केल्याने अपिलीय अधिकारी यांनी गुलाबराव पाटील यांच्या कडिल सत्य बाजु समजून नाशिक विभागीय आयुक्त अजय मोरे साहेब यांनी दाखल अपिल अर्ज क्रमांक 33/2025 मध्ये दि 17 /1/20 26 रोजी पारोळा तालुक्यातील पिंपरी मोंढाळे येथील ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच पुष्पा रामकृष्ण पाटील हिच्या पतीने व कुटुंबातील एकत्रित लोकांनी सरकारी गायरान जमीन व शासकीय रस्ता वर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाले आहे म्हणून महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा कलम नुसार ग्रामपंचायत सदस्य पद रद्द करण्यात आलेले आहे तसेच तिने व तिच्या पतीने सासऱ्याने जे ठाणे जे सरकारी जागेवर अतिक्रम केलेले आहे ते सर्व अतिक्रमण एक महिन्याच्या आत निष्का शीत करण्याच्या आदेश माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांनी यापूर्वी दिलेल्या आहे लेखी तक्रार दाखल करून सुमारे चार वर्षे होऊन सुद्धा प्रकरण प्रलंबित ठेवून गैरजदार पुष्पा रामकृष्ण पाटील व तिचे पती रामकृष्ण गंभीर पाटील यांनी शासनाची मोठ्या प्रमाणावर दिशाभूल खोटे पुरावे खोटे दाखले खोटे ठराव सादर करून खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून दिशाभूल करून प्रकरण पलंबित ठेवले आपले पद वाचवावे म्हणून अतिक्रम वाच वले परंतु गुलाबराव जगन्नाथ पाटील यांनी सतत पाठपुरावा व माननीय अप्पर आयुक्त अजय मोरे साहेब यांच्याकडे लेखी पुराव्या अभावी सर्व पुरावे दाखल करून सदस्य उपसरपंच पुष्पा रामकृष्ण पाटील हिला कायमस्वरूपी अपात्र करण्याचे आदेश झालेले आहेत तसेच सरकारी गायरान जमीनीवर आणि ग्रामपंचायत हदीत केलेले सर्व अनाधिकृत सिमेंट काँक्रीटचे बांधकाम व इतर हि कच्चे व पक्के अतिक्रमण एक महिन्याच्या आत तात्काळ शासकीय नियमानुसार व मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या न्याय निर्णय नुसार तात्काळ निष्कासित करण्याचे आदेश दिले आहे तसेच अतिक्रमण करणाऱ्या विरुद्ध कायदेशीर कारवाई व दंडात्मक कारवाई व फौजदारी कारवाई व गुन्हा दाखल करण्यात यावा आणि विशेष म्हणजे अनाधिकृत अतिक्रमण धारकांना मदत करणारे व इतर यांच्या वर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत आदेशाची योग्य अंमल बजावणी करण्यास कसुरी हेच जबाबदार राहतील अशी शासनाच्या आदेश आहेत सदर दाखल प्रकरणी कामकाज पाहणारे व मार्गदर्शन करणारे विधी सल्ला गार संदीप जावरे साहेब धुळे जिल्हा आणि दुसरे विधी सल्ला गार अनवर शेख साहेब जळगाव जिल्हा यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button