मुंबई येथील कुर्ला पश्चिम रेल्वे स्टेशन रोडवरील आंबेडकर नगर येथील बेस्ट बस ने दहा ते बारा जणांना चिरडल्याची घटना
आज पर्यंत एसटी बस असो किंवा बेस्ट बस असो अशा भरपूर घटना होऊन गेल्या कधी एक्सीडेंट तर कधी बस फेल तर कधी ब्रेक फेल फक्त भाडे वाढवून सेवा देण्याच्या ऐवजी मृत्यूच्या दारात प्रवाशांना जावं लागत आहे रस्त्यावरून निरपराध चालणाऱ्यांचा दोष काय याला जबाबदार कोण अनेक घटना घडल्या घटनांमध्ये अनेक जण मृत्यूमुखी पडले एसटी वर्कशॉप मध्ये जे पार्ट निकामी झालेले असतील यांचा वापर पुन्हा होतो याची दाट शक्यताअसल्यामुळेच एक्सीडेंट परत होत आहे कारण भ्रष्टाचार होत असल्याच्या अनेक न्यूज आज पर्यंत समोर आलेल्या आहेत पार्ट बसवताना त्याची ट्रायल झाली पाहिजे आणि पार्ट ओरिजनल असावा याची काळजी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी लक्ष दिले पाहिजे त्यामुळे असे एक्सीडेंट होणार नाही याची काळजी घ्यावी कुर्ला येथील एलबीएस मार्गक्रमण करत असताना भरधाव बेस्ट बसचा अचानक ब्रेक फेल झाल्याने बेस्ट बसने धडक दिल्यामुळे सात ते आठ जणांचा जागेवरच मृत्यू झाला फोर व्हीलर आणि रिक्षा यांचा चक्काचुर झाला आहे अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर बेस्ट बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे ही घटना घडली असावी अशी माहिती देण्यात आली बेस्ट क्रमांक 332 ही बस कुर्ला येथून अंधेरी कडे जात होती त्याचवेळी बसचा ब्रेक फेल होऊन बुद्ध कॉलनी जवळील आंबेडकर नगर येथे हा अपघात झालेला आहे सुमारे 12 ते 13 जणांना चिरडल्याची माहिती मिळत आहे मृतांचा आकडा वाढू शकतो जखमींना सायन प्रशिक्षण केंद्र व कुर्ला येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांना अचानक धडक दिल्यामुळे कोणाला काहीच पत्ता लागला नाही की आपला क्षणात मृत्यू होणार या भीषण अपघातात संतप्त लोकांनी बेस्ट बसची तोडफोड केली आहे पुढील तपास कुर्ला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व त्यांचे सहकारी करीत आहेत