महाराष्ट्र चंद्रपूर जिल्ह्यात किडनी रॅकेटचा घोटाळा उघड काही डॉ; आणि एजंट यांच्यामार्फत होत होती किडण्याची तस्करी सावकारी कर्ज घेतलेल्या गरीब लोकांच्या किडण्या विकल्या चंद्रपूर जिल्ह्याचे मा; एस पी आणि ॲडिशनल एस पी चंद्रपूर एलसीबी टीम यांचा तपास महत्वपूर्ण ठरला

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी नागभीड तहसील विभागात किडन्या विकण्याचा गोरख धंदा सुरू होता शेवटी तो किडण्या विकण्याचा गोरख धंदा उघडकीस आला आणि गुन्हा दाखल करणारे रोशन कुडे आणि त्यांचे साथीदार यांनी ब्रह्मपुरी नागाभिड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे किडनी विकणाऱ्यांची थेट कंबोडिया विदेशात संबंध असल्याचा खुलासा आरोपी कृष्णा व हिमांशू भारद्वाज यांच्यावर गुन्हे दाखल झाले असून गुन्हा क्रमांक 654/2025 धारा 387 342 294 506 120 बी 326 भादवी धारा 39 44 महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 च्या कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून विशेष पथक तयार करण्यात आले आहे त्यानंतर धारा 18/ 19 The Transplantation of human organs and Tissues Act 1994 च्या कायद्यानुसार सावकारी आणि किडनी विकणारे यांना जेरबंद करण्यात आले आहे किडनी ज्यांची विकली गेली ज्यांनी केस दाखल केली होती त्या केसचा तपास चंद्रपूरचे माननीय एसपी सो; ॲडिशनल एस पी सो ;पोलीस कर्मचारी यांनी तत्काळ दखल घेतली आणि आरोपी कृष्णा उर्फ रामकृष्ण सुचू आणि हिमांशू भारद्वाज यांना तात्काळ अटक केली आहे त्यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर किडनी रॅकेट चे धागे दोरे थेट विदेशापर्यंत पोहोचले असे तपासात आढळून आले रोशन कुडे यांच्या किडन्या काढण्यासाठी आणि त्यांचे साथीदार यांना तामिळनाडू दिल्ली पर्यंत घेऊन जाणारा हिमांशु भारद्वाज ने जुलै 2022 मध्ये आर्थिक परिस्थिती आणि सावकारी कर्ज असल्याकारणाने कृष्णा उर्फ रामकृष्ण सुचू याच्या माध्यमातून तामिळनाडूच्या स्टार किम्स दवाखान्यात घेऊन गेले त्या दवाखान्यातील मुख्य निर्देशक डॉक्टर राजरत्न गोविंद स्वामी आणि दिल्लीचे डॉक्टर रवींद्र पाल सिंह यांच्या माध्यमातून अवैध किडनी काढण्याची सुरुवात झाली त्या अगोदर त्यांनी किती लोकांच्या किडन्या काढल्या याचा तपास सुरू आहे सुरुवातीला तपास केला असता किडनी विकणारा याला काय मिळते किडनी विकत घेणारे 50 ते 80 लाख रुपये देतात त्यानंतर डॉक्टर रवींद्र पाल सिंग दिल्लीला 10 लाख रुपये त्यानंतर स्टार किम्स दवाखान्याचे संचालक डॉक्टर राजरत्न गोविंद स्वामी त्रीची आणि सर्जरी हॉस्पिटेलिटी उपलब्ध करून देण्यासाठी 20 लाख रुपये त्यानंतर कृष्णा उर्फ रामकृष्ण सुचू आणि बाकीचे इतर लोकांना 20 लाख रुपये मिळत होते आणि किडनी विकणाऱ्याला केवळ 5 ते 8 लाख रुपये मिळत होते या सर्व माहितीमुळे स्थानीय शाखा चंद्रपूर एलसीबी ही टीम तामिळनाडूच्या स्टार स्कीम्स हॉस्पिटल त्रीची येथे गेल्यावर डॉक्टर राजरत्न गोविंद स्वामी यांची चौकशी केल्यानंतर त्यांना लवकरच जेरबंद करण्यात येईल त्यानंतर चंद्रपूर येथील एलसीबी टीम दिल्ली येथे जाऊन डॉक्टर रवींद्र पाल सिंग यांना पुराव्यानिशी ताब्यात घेण्यात आले त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 2 जानेवारी 2026 पर्यंत चंद्रपूरचे माननीय मुख्य न्यायाधीश यांच्यासमोर उभे राहण्याचे आदेश दिले आहे पुढील तपास एस पी सो चंद्रपूर यांची टीम करीत आहे










