NH 38 महामार्ग स्लीपर कोच बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात बसला आग लागल्यानंतर होरपळून 17 जणांचा मृत्यू बंगळूर ते गोकर्ण कडे जाणारी बस सरकारी नियम धाब्यावर ओव्हरलोड वाहनांचे रॅकेट चालवणारा अधिकाऱ्यांची चौकशी करा परत परत एक्सीडेंट दुर्घटना होत असून नियम कधी लागू करणार

कर्नाटकातील चित्रदुर्गातील हिरीपूर तालुक्यातील NH 38 राष्ट्रीय महामार्गावर गोरलड्डू गावाजवळ मोठा अपघात झाला यात 17 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला बेंगलोर कडून गोकर्णकडे जाणाऱ्या स्लीपर कोच बसची भरधाव ट्रकची धडक झाल्यामुळे हा भीषण अपघात झाला असून बसने लगेच पेट घेतला यामुळे एकूण मृतांचा आकडा 17 पर्यंत पोहोचला आहे मिळालेल्या माहितीनुसार बस मंगरूळ होऊन निघाली त्यानंतर पहाटे दोन वाजण्याच्या सुमानास बस गोरलट्टू गावाजवळ आल्यावर हिरी पुरवून बेंगलोर कडे जाणारी एक ट्रक अचानक रस्त्याचे दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने आली आणि थेट बसला थडकली हा अपघात इतका मोठा होता की लगेचच बस ने पेट घेतला आणि काही क्षणातच संपूर्ण बस आगीच्या हवाले झाली समोर प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनी ही घटना पाहिली आणि धडक दिल्यानंतर अनेक प्रवाशांचा मोठमोठ्याने आवाज आल्यामुळे अनेक जण पाहणारे इथपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत बसने पेट घेतला बाकीचे काच फोडून बस मधून बाहेर निघण्याच्या प्रयत्न केल्यामुळे ते बाहेर निघाले आग मागच्या बाजूने इतक्या वेगाने पसरली की अनेक प्रवासी बाहेर पडू शकले नाही या आगीमध्ये नऊ प्रवाशांचा जागेवरच जळून मृत्यू झाला मृतांचा आकडा सतराच्या वर पोहोचला त्यांना तातडीने रुग्णवाहिनी टाकून चित्रदुर्ग जिल्ह्या च्या रुग्णालया त दाखल करण्यात आले जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळतात पोलीस अग्निशामक विभाग तात्कालीन सेवा अतिदक्षता विभाग सेवा घटनास्थळी पोचल्या मात्र तोपर्यंत आगीमध्ये अनेक जण मरण पावले होते अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली परंतु बस तोपर्यंत पूर्ण जळून खाक झाली पोलिसांनी गुन्हा तर दाखल केला असून तपास सुरू आहे प्रत्येक वेळेस अशा घटना होऊन अनेक कुटुंब उध्वस्त होत आहे याला जबाबदार आरटीओ विभाग आणि परिवहन मंत्री नियमानुसार स्लीपर कोच डबल डेक्कर या वाहनांची रस्त्यावर संविधानानुसार परवानगी आहे का कारण आपत्कालीन घटना ज्यावेळेस घडतात त्यावेळेस वरती झोपलेले किंवा बसलेले सीट यांना संकटकाळी समई बाहेर निघता येत नाही त्याबद्दल अनेक वेळेस निवेदन तक्रार अर्ज दाखल झाल्यानंतरही आरटीओ विभागाने याची दखल घेतली नाही त्यामुळे असे अपघात घडून मृत्युमुखी झालेल्यांची संख्या किती? यांचा आकडा जनतेपर्यंत फक्त पत्रकारच पोच होतात परिवहन विभाग किंवा आरटीओ विभाग हे मृतांचे आकडे का लपवत असतात यांची नोकरी जाईल म्हणून









