ताज्या बातम्या

बुलढाणा जिल्हा महिला उद्योजकता शिबिर यशस्वी रित्या संपन्न कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल जयस्वाल तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर गिरीश माळी संस्थेचे अनेक मान्यवर उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते


बुलढाणा जिल्हास्तरीय महिला उद्योजकता शिबिर प्रत्येक शाळेत कॉलेजमध्ये झाले पाहिजे बुलढाणा येथील महिला उद्योजकता शिबिर कार्यक्रम मोठ्या उत्साहात कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल जयस्वाल कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर गिरीश माळी संस्थेचे सचिव अनुप पुराणिक पुंडलिक महाराज महाविद्यालय नांदुरा प्राचार्य डॉक्टर राजपूत महाविद्यालयाचे शारीरिक विभाग प्रमुख डॉक्टर प्रवीण डांबरे तसेच इन्क्युबेशन सेंटरचे कोऑर्डिनेटर हे कार्यक्रमाचे मुख्य कार्यवाहक होते प्राध्यापक प्रदीप चव्हाण न्याक कोऑर्डिनेटर आणि रुबल फाउंडेशन चे सीईओ डॉक्टर कुलदीप सिंह राजपूत राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक वीरकर उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते हस्त निर्मित पेपरचे निर्माते डॉक्टर विकास जाधव कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख पूजा मात्रे जिल्हा खादी ग्रामोद्योग केंद्र बुलढाणा जिल्ह्याचे काथोटे यांची सुद्धा उपस्थिती होती कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर पिचिंग कॉम्पिटिशन परीक्षा घेण्यात आली यामध्ये तीन विविध ठिकाणी स्पर्धा घेतल्या गेल्या प्रथम क्रमांक सविता संजय देशमुख यांचा व्यवसाय मिलेटसं प्रिमिक्स प्रॉडक्ट द्वितीय क्रमांक सोहनी वेरुळकर यांच्या पेटिकोट व्यवसाय तृतीय क्रमांकास विजय माला कैलास वानखेडे यांच्या सफेद मुसळी चौथा क्रमांक पूजा सुधीर देशमुख यांचा व्यवसाय सर्व प्रकारचे मसाले आणि पाचवा क्रमांक शोभा येऊल सॅनिटरी पॅडचा व्यवसाय असून खूप मेहनत करून पारितोषिके मिळवली दीक्षा राहुल वाघोदे यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले तसेच गोमासे सर व सौ गोमासे ऑरगॅनिक शेती पद्धती याची माहिती अनेक जणांना दिल्यामुळे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला त्यांना मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले पिचींग कॉम्पिटिशन चे निर्णय प्रक्रिया ग्रंथालय प्रमुख प्राध्यापक संतोष कतोरे यांच्या अध्यक्षतेखाली सौ अर्चना जोशी गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख आणि रुबल फाउंडेशन चे कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पूर्ण करण्यात आला महिला उद्योजक आणि बचत गटाच्या सदस्यांनी विविध स्टॉल लावले होते या स्टॉलमध्ये महिलांनी विविध प्रकारचे खेळणी खाद्यपदार्थ उत्पादने कशा पद्धतीने तयार करतात एक महत्वपूर्ण आकर्षण वाटत होते सगळे उपस्थित राहिल्याबद्दल ज्ञानेश्वरी नागरी पतसंस्थेने चहापाणी व जेवणाची व्यवस्था केली त्यामुळे ज्ञानेश्वरी नागरी पतसंस्थेचे आभार मानण्यात आले असे कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात झाले पाहिजे महिलांना स्वयंरोजगार उद्योग मिळावा यासाठी एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम बुलढाणा जिल्ह्यात झाला


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button