ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण व वेतन अधीक्षक इजाज तडवी यांना निलंबित करण्याची मागणी आतापर्यंत अनेक तक्रारी आल्या असून शिक्षक बदली शिक्षक पगार शिक्षक पेन्शन या प्रकरणासाठी विलंब व तक्रारी त्यामुळे जि जळगाव ता पाचोरा भडगाव आमदार किशोर पाटील यांनी निलंबित करण्याची मागणी केली आहे


जळगाव जिल्ह्याच्या जिल्हा परिषद माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण व वेतन अधीक्षक तडवी यांना निलंबित करण्याची मागणी पाचोरा भडगाव चे आमदार किशोर पाटील यांनी केली आहे हे दोघे गणवेश घोटाळ्यात निलंबित असून न्यायालयीन स्थगिती आदेशामुळे सध्या ते कार्यरत आहे ज्या कारणास्तव त्यांना निलंबित करण्यात आले आहे त्याच जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार सौ कल्पना चव्हाण यांच्याकडे आहे त्यांच्या कार्यक्षेत्रातील शिक्षण संस्थांच्या खोट्या चौकशी लावतात शिक्षण व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार थांबवून त्यांना जाणून बुजून त्रास देतात त्यांची आर्थिक व मानसिक फसवणूक करतात त्यानंतर वेतन अधीक्षक इजाज तडवी याने स्वप्निल पाटील जळगाव पंकज पाटील पाचोरा सतीश पाटील व सौ कल्पना चव्हाण यांचे पती विस्ताराधिकारी याच्या माध्यमातून लाखो रुपयांची मायापुंजी जमवली व आजही तेच कार्य करत आहे म्हणून त्यांच्या विरोधात ज्या तक्रारी आल्या आहेत त्या सर्व तक्रारींची चौकशी करण्यात यावी आणि त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी पाचोरा भडगाव चे आमदार किशोर पाटील यांनी केली आहे राज्याचे शालेय शिक्षणाधिकारी माननीय दादा भुसे यांच्याकडे सुद्धा तक्रार केली आहे आमदार किशोर पाटील यांच्या पत्राच्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या कक्ष अधिकारी निशा महाजन आयुक्त शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडे 11 डिसेंबर 2025 रोजी पत्र पाठवून कल्पना चव्हाण व इजाज तडवी यांना निलंबित करण्यात यावे असे कळविण्यात आले आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button