जिल्हा जळगाव पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील अटलगव्हाण गावातील विहिरीत काम करताना इलेक्ट्रिक मोटरीचा शॉक लागून मजुराचा मृत्यू

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलिस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या अटलगव्हाण गावात शनिवारी दुपारी एक धक्कादायक अपघात घडला. विहिरीत क्रेन च्या सहाय्याने काम करत असताना इलेक्ट्रिक मोटरचा तीव्र शॉक लागून संजय मोझे (वय अंदाजे ५०) या मजुराचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे घटनेनंतर गंभीर अवस्थेत संजय मोझे यांना तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासणीदरम्यान त्यांना मृत घोषित केले. अचानक झालेल्या या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे पाचोरा सेफ्टी उपायांचा अभाव ठरला जीवघेणा संजय मोझे हे विहिरीतील क्रेन च्या सहाय्याने काम करत असताना आवश्यक सुरक्षा साधने न वापरल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे ओले वातावरण विद्युत प्रवाह आणि सुरक्षा उपायांचा अभाव यामुळे इलेक्ट्रिक शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती मृत व्यक्तीची पत्नी व प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिली पाचोरा पोलिसांसह पुढील तपास सुरू सदर घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदनासाठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. अपघाती मृत्यूची नोंद करून पुढील तपास पिंपळगाव पोलिस स्थानकाचे अधिकारी करत आहेत. अचानक गेलेल्या संजय मोझे यांच्या निधनामुळे अटलगव्हाण गावात दुःखाचे सावट पसरले असून कुटुंबावर शोककळा पसरली आहे






