ताज्या बातम्या
जिल्हा जळगाव तालुका पाचोरा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ आज कैलामाता मंदिर येथे माजी आमदार मा. दिलीपभाऊ वाघ सौ. वैशालीताई सुर्यवंशी व अमोलभाऊ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला मंगलमय वातावरणात महाआरती करून व नारळ वाढवून या प्रचार शुभारंभाला सुरुवात करण्यात आली त्यानंतर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. सुचेताताई दिलीप वाघ व प्रभाग क्र. १० मधील नगरसेवक पदाचे उमेदवार श्री सुरज संजय वाघ आणि सौ. सीमा समाधान पाटील यांच्या प्रचारार्थ मध्ये भव्य प्रचार रॅली काढण्यात आली रॅलीला भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक तसेच असंख्य मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला या रॅलीमुळे परिसरात उत्साह जोश आणि आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले










