दिनांक 1 नोव्हेंबर 2025 आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढ दिवस आणि निर्धार मेळावा एकच चर्चा एकला चलो रे या विषयावर सभा गाजली विरोधी पक्ष शिल्लक राहिलेला नाही सगळ्या पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते शिंदेसेना कडे आले पाचोरा भडगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर झाला परंतु सरकारने 1 वर्षात 1 फुटकी कवडी सुद्धा दिली नाही आता शेवटचे 10% उत्पन्न परतीच्या पावसाने हिरावून घेतले शेतकऱ्यांना परत उभ करण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री यांनी 30 जून पर्यंत सोसायटी माफ करू असे सांगितले परंतु 30 जून ही तारीख देऊ नका शेतकऱ्या तत्काळ कर्जमाफी करा असे आव्हान पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांनी केले

पाचोरा भडगाव मतदार संघातील आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसाच्या आणि निर्धार मेळाव्याच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्याचे प्रमुख अतिथी पाणीपुरवठा मंत्री आमदार गुलाबराव पाटील मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील अमळनेर चे माजी आमदार शिरीष भाऊ चौधरी विष्णू भाऊ भगाळे अनिल भाऊ चौधरी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवसेना उपजिल्हाप्रमुख मार्केट कमिटीचे सदस्य शिवसेनेचे आजी-माजी कार्यकर्ते व्यासपीठावर उपस्थित होते निर्धार मेळाव्यात आलेल्या सगळ्यांचे मनापासून अभिनंदन आज दिनांक 1 नोव्हेंबर रोजी निर्धार मेळावा असल्यामुळे मी अनेक कार्यकर्त्यांना भेटू शकलो नाही तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेत मी तुमच्या परवानगीशिवाय आणि वरिष्ठांच्या परवानगी विना पाचोरा भडगाव मतदार संघात येत्या नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकी अकेला चलो रे निर्णय घेतला त्यामुळे मी वरिष्ठांची माफी मागतो पण मी हा निर्णय का व कशाकरता घेतला याची संपूर्ण माहिती आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली मी घेतलेला निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे भाषणातून आप्पांनी स्पष्ट करून दिले मी दहा वर्षापासून प्रामाणिकपणे काम केले असून युती धर्म निभवला लोकसभेत जळगाव जिल्ह्यातील दोन्ही खासदार निवडून आणण्याची जबाबदारी घेतली आणि त्यात माझा सुद्धा खारीचा वाटा होता असे प्रतिपादन किशोर पाटील यांनी केले आज आणि इथून पुढे भविष्यात राजकीय करिअर माझ्या शिवसैनिकांसाठी त्यांना निवडून आणण्यासाठी मी हा निर्णय घेतला आदरणीय महसूल मंत्री बावनकुळे यांनी नागपूर येथील भाषणात सांगितले की भाजपामध्ये बंडखोरी जो करेल त्याला पाच वर्ष पक्षातून हकालपट्टी केली जाईल असे सांगितले असताना सुद्धा ज्यांनी बंडखोरी केली आदेशाचे पालन केले नाही त्यांना भाजप पक्षाने शाबासकी दिली आणि त्यांनाच उमेदवारी दिली हे सगळं विष आम्ही पचवू शकलो परंतु माझ्या मतदारसंघात माझे शिवसैनिक रात्रंदिवस मेहनत करून एकनिष्ठ राहून त्यांची जर अवहेलना होत असेल तर मी ती पाहू शकणार नाही म्हणून मी एकला चलो रे असा निर्णय घेतला माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात झालेले निर्णय लाडकी बहिणी योजना महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी निर्णय घेतला मी जर पुन्हा मुख्यमंत्री झालो तर लाडकी बहीण योजनेसाठी दर महिन्याला 2100 रुपये देईल असे सुद्धा एकनाथ शिंदे यांनी सांगितले शिक्षणासाठी पैसे नसल्याने एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली तर लगेच एका रात्रीत निर्णय घेऊन श्री शिक्षण फुकट शेतकऱ्यांसाठी एक रुपया मध्ये पिक विमा चालू करणारे माननीय एकनाथरावजी शिंदे आणि एक रुपयात पिक विमा योजना आज जर ती योजना सुरू राहिली असती तर आज मला कोणाकडे भीक मागायची गरज राहिली नसती त्यानंतर ते पुढे म्हणाले की मी एकच पक्षात शिवसेनेत निष्ठावंत राहिलो मागील काळात पाचोरा भडगाव मतदार संघात अनेक घडामोडी झाल्या स्वर्गीय मा; आमदार आर ओ तात्या यांनी मला पोलिसाची नोकरी सोडून राजकारणात आणले मला राजकारणात यायची इच्छा नव्हती तर तात्यांनी मला सांगितले पुढचा शिवसैनिकांचे कार्य आणि वारस किशोर आप्पा राहील असे तात्यांना 101% माहिती होते म्हणूनच तात्यांनी किशोर आप्पा यांना आपले वारीस म्हणून घोषित केले होते तात्यांचे अकस्मात मृत्यू झाल्यामुळे माझी बहीण वैशालीताई राजकारणात आल्या मी शिंदे शिवसेना सोबत गेलो म्हणून मला गद्दार म्हणून माझ्या वडिलांचे विरोधात कार्य केले म्हणून वही ताईंनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आणि अनेक ठिकाणी माझा अपमान केला त्यानंतर तात्यांचा फोटो शिंदे सेनानी कुठेही लावू नये आता निष्ठा मी सोडली का वैशू ताईने सोडली? मी तर शिवसेनेचाच राहिलो/ जनता समोर पाहत आहे भावाला पाडण्यासाठी तुम्ही काय काय केले हे जनतेला माहित आहे तुम्ही बोलले की मी माझ्या वडिलांच्या पक्षात एकनिष्ठ काम करेल त्याचे झाले काय? तुम्ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून तिकीट घेतलं आणि नऊ महिन्यानंतर एका रात्रीतून पक्ष बदलला कुठे गेली तुमची एकनिष्ठता कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले 7000 कार्यकर्त्यांमधून आज रोजी तुमच्याकडे दोन-चार कार्यकर्ते तुमच्या बरोबर आले शेवटी झाले काय? त्यानंतर शेंदुर्णीचे संस्थाचालक गरुड पाचोरा शिक्षणाचे संस्थाचालक दिलीप भाऊ वाघ त्यानंतर संस्थाचाल वैशालीताई सूर्यवंशी आणि शेवटी भडगावचे प्रताप हरी यांनी एका पाठोपाठ भाजपामध्ये प्रवेश केला कशासाठी केला? याची कारणे यांच्या शिक्षण संस्थावर एसआयटी नेमण्यात आली यांनी अनेक जणांचे नोकरीला लावण्यासाठी घेतलेले पैसे पैसे देणाऱ्यांना किती जण नोकरीला लावले हा तपास करण्यासाठी एसआयटी नेमण्यात आली म्हणून यांनी सर्वांनी घाबरून पक्षप्रवेश केला त्यानंतर आजचे उपमुख्यमंत्री अजित पवार 70 हजार कोटीचा सिंचन घोटाळा करून अजित पवार यांनी भाजपाची युती केली तिकडे जाऊन वॉशिंग मशीन मध्ये धुतले गेले का? आणि तिकडे शरद पवार म्हणतात आपल्याला एकत्रित यावे लागेल हे नेमके कोणाला सांगत आहे स्वतःच्या घरामध्ये ठाव ठिकाणा नाही आणि चालले दुसऱ्याला सांगायला त्यानंतर किशोर पाटील पुढे म्हणाले माझ्या विरोधात एकत्र आलेल्या ना उमेदवार भेटत नाही आणि माझ्याकडे कोणाला उमेदवारी द्यावी इतके कार्यकर्ते माझ्याकडे आहेत मी कधीही वाटाघाटी केली नाही आणि एकाच पक्षात निष्ठावंत राहिलो माझ्या कार्यकर्त्यांना मी कधीही एकटे पडू दिले नाही माझी दुकान कायम सुरू आहे ती कधीही कार्यकर्त्यांसाठी बंद पडणार नाही काहींची दुकान बंद पडली पक्षप्रवेश करून घेतला आपल्या मागच्या वाडवडिलांनी राजकारण कसे केले याची जाणीव किशोर आप्पा पाटील यांनी करून दिली माझ्या कोणत्याही कार्यकर्त्याची माझ्याकडून फसवणूक होऊ देणार नाही तसे कार्यकर्त्याने सांगितले तर मी त्या दिवशी राजीनामा देईल आमची वैशू ताई एकटीच पंढरपूरला निघून गेली कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन गेली नाही त्या कार्यकर्त्यांना मी माझ्या शिवसेनेत घेतले आता अमोल भाऊ शिंदे यांनी दोन पंचवार्षिक आमदारकीचे इलेक्शन अपक्ष माझ्या विरोधात लढवले शेवटी 7/12 उताऱ्यावर जागा नाही एवढे कर्ज करून इलेक्शन लढवले आज भारतीय जनता पार्टीत नवीन प्रवेश करणारे माझ्या छाताडावर बसवले अमोल भाऊ चा सुद्धा विश्वासघातच झाला असे अमोल भाऊच्या मनात तर नक्की आले असेल ना? मी 10 वर्षापासून एकटा लढत होतो आता पुढे काय होणार _ _ _?








