लोकशाहीत अजून किती वर्ष अन्याय सहन करायचा अन्याय कशासाठी सहन करत आहे प्रत्येक वेळेस घटना झाली त्या घटनेपुरता मर्यादित नंतर परत तेच परत तेच नंदुरबार जिल्ह्यात चांदसौली 35 नागरिकांची अवैध वाहतूक करताना झालेल्या अपघातात 8 निरपराध व्यक्ती मृत्युमुखी पडले त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली नंदुरबार जिल्ह्या तील परिवहन अधिकारी उत्तम जाधव व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना सेवेतून बंडतर्फ करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणे बाबत सामाजिक कार्यकर्ता गणेश ढेंगे यांचे निवेदन

नंदुरबार जिल्ह्यातील अवैध प्रवासी वाहतूक चांदसौली घाटात वाहन क्रमांक MH 39AD 2802 मालवाहू वाहनातून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यावर नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिताली सेटी पोलीस अधीक्षक नंदुरबार परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य विवेक भिमनवार यांनी चौकशी करून अवैध वाहतुकीस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांना बंडतर्फ करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जळगाव गणेश ढेंगे यांनी तक्रार अर्ज केला असून त्याची दखल जिल्हाधिकारी यांनी घ्यावी प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थिती वाहन निरीक्षक यांच्या ऐवजी अधिकार नसलेले सहायक मोटर वाहन निरीक्षक यांची नेमणूक होते केवळ भ्रष्टाचाराचे पैसे अधिक मिळणे यासाठी उत्तम जाधव हे मोटार वाहन निरीक्षकाची नेमणूक केवळ सीमा नाका तपासणी केंद्रावर करतात प्रत्येक ठिकाणची परिस्थिती नंदुरबार जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांची संख्या जास्त असते त्यामुळे भ्रष्टाचार व लाचेच्या पैशासाठी उत्तम जाधव यांनी वायुवेग पथक व दंडांची आकारणी हा हिशोब त्यांच्याकडेच ठेवलेला असून त्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते यांनी दिनांक 20/ 2/ 2024 रोजी परिसर तक्रार दिली असून त्याची चौकशी आजपर्यंत झालेली नाही त्या अनुषंगाने प्रादेशिक परिवहन अधिकारी धुळे यांनी ची तक्रार उचित कार्यवाहीसाठी नंदुरबार कार्यालयाकडे दिनांक 28/ 2/ 2024 रोजी वर्ग केलेली आहे कायदेशीर तरतुदीनुसार अकार्यक्षम व अधिकार नसलेल्या अधिकाऱ्यांच्या नेमणुकीमुळे नंदुरबार जिल्ह्यात अवैध वाहतूक प्रवासी बळवलेली असून असे प्रकार नेहमी घडत असतात हा प्रकार मोठा असल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात एकच खडबड उडाली त्याला अपवाद म्हणजेच महाराष्ट्र काय संपूर्ण भारतात अवैध वाहतूक लक्झरी वाहतूक लक्झरीचे डबल डेकर परवानगी नसताना सुरू आहे म्हणून लक्झरी यांचे एक्सीडेंट झाल्याबरोबर मुख्यमंत्री निधी का देतात? जर लक्झरी व अवैध वाहतूक करणारे यांचा विमा फुल इन्शुरन्स असल्यावर मुख्यमंत्री सहायता निधी का दिली जाते? नंदुरबारचे परिवहन अधिकारी उत्तम जाधव हे कार्ड पद्धतीने अवैध वाहतुकीस सुरक्षा देऊन मोठ्या प्रमाणात अवैध संपत्ती जमा करीत आहे त्यांना ई चलन या संगणकीय प्रक्रियेत त्यांच्याच कालखंडात करोडो रुपयाचा अपहार केला आहे मूळ मेमो व दंडाची रक्कम यांचा कुठेही ताळमेळ लागत नाही मालवाहतूक वाहनास अवैध प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी नसताना त्या वाहनात 35 प्रवासी जनावरांसारखे बसवून त्यातील 8 निरपरात प्रवासींचा जीव गेला त्या अपघाताच्या तांत्रिक तपासणी कामी उत्तम जाधव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुरबार अशोक पवार प्रादेशिक परिवहन अधिकारी धुळे यांच्यावर कायद्यानुसार जबाबदारी निश्चित असताना देखील अपघात झाल्यानंतर लवकर पोहोचलेच नाही एवढ्या मोठ्या जीवित हानीनंतर जबाबदारी काय असते यांचे भान अधिकाऱ्यांना राहिलेले नाही त्यानंतर राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी सुद्धा पाठ फिरवली निरपरात 8 लोकांचे संसार उध्वस्त होऊन कायद्याच्या कचाट्यात असलेल्या अधिकारी आपली जबाबदारी झटकली मागील परिवहन विभागाची शासनाची कार्यपद्धती पाहता 6 विद्यार्थी चा मृत्यू झाल्यामुळे तत्कालीन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांना तात्काळ निलंबन केले होते समृद्धी महामार्गावर अनेक एक्सीडेंट झाले त्यात एक लक्झरी त्यानंतर महामार्गावर बस ने अचानक पेट घेतल्यामुळे शासनाने वायूवेग पथकातील अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले होते व संपूर्ण परिवहन अधिकारी यांचे निलंबन केले परंतु जबाबदार कोण आहे याची चौकशी अजून पर्यंत झाली निरपराध लोकांचे निलंबन झाले भारतात लोकशाही पद्धत असून कायद्यानुसार अधिकाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही होणे आवश्यक असते परंतु ज्या अधिकाऱ्यांनी मोठमोठे भ्रष्टाचार केले त्यांच्यावर आजपर्यंत कार्यवाही झाली नाही याचाच अर्थ पैशाची देवाण-घेवाण ही वरपर्यंत आणि मोठी साखळी आरटीओ खात्यात मोठ्या प्रमाणात असून ती बंद होण्याचं नाव घेत नाही या सर्व सदोष शासन प्रणालीमुळे 8 मृत इसमांच्या परिवारास प्रत्येकी 50 लाख रुपये द्यावे व अपघात ग्रस्त यांना शासन दरबारी नोकरी द्यावी वरील प्रमाणे दिलेल्या निवेदनावर कार्यवाही न झाल्यास पुढील कायदेशीर परिणाम लोकशाही पद्धतीने होणाऱ्या आंदोलनास संबंधित प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे जळगावचे सामाजिक कार्यकर्ते गणेश ढेगे यांनी निवेदनाद्वारे माहिती दिली आहे









