जिल्हा जळगाव तालुका पाचोरा नगर परिषदेतर्फे दिनांक ३०/०९/२०२५ प्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजना PM SVANidhi २०३०पर्यंत लागू

जिल्हा जळगाव तालुका पाचोरा नगर परिषदेतर्फे दिनांक ३०/०९/२०२५ प्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजना PM SVANidhi २०३०पर्यंत लागू पाचोरा नगरपरिषद पाचोरा शहरी भागातील नागरिकांना जाहीर आवाहन प्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजनामध्ये सुधारणा करून योजनेचा कालावधी ३१ मार्च २०३० पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे पाचोरा नगरपरिषद पाचोरा शहरी भागातील पथ विक्रेते लघुउद्योजक व DAY-NULM अभियान अंतर्गत महिला बचत गटातील महिलांना तसेच त्यांचे कुटुंबीयांना लाभ घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे योजनेतून लाभार्थ्यांना उपलब्ध होणाऱ्या कर्ज मर्यादेत लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. पहिला टप्प्यात पूर्वी १० हजार असलेली मर्यादा आता १५ हजार करण्यात आली दुसरा टप्प्यात २० हजाराची मर्यादा वाढवून २५ हजार करण्यात आली तिसरा टप्पा हा पूर्वीप्रमाणेच ५० हजाराचा कायम ठेवण्यात आला आहे तथापि वेळेवर हप्ता परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना आता UPI लिंक रुपे क्रेडिट कार्डची सुविधा मिळणार आहे त्याद्वारे वैयक्तिक गरजांसाठी तात्काळ आर्थिक मदत मिळू शकेल तसेच डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी कॅशबॅकची तरतूदही करण्यात आली आहे याशिवाय फेरीवाले व पथ विक्रेत्यांना उद्योजकता आर्थिक साक्षरता डिजिटल कौशल्य व मार्केटिंग या विषयांवर प्रशिक्षण दिले जाणार आहे. विशेष म्हणजे भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणतर्फे स्वच्छता व अन्नसुरक्षा यावर स्वतंत्र प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घेण्यासाठी दिनांक ३०/०९/२०२५ रोजी व्यपारी भवन भडगाव रोड पाचोरा येथे लोककल्याण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे तसेच नागरिकांनी शहर अभियान व्यवस्थापन कक्ष DAYNULM पाचोरा नगरपरिषद पाचोरा येथे संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा मंगेश देवरे मुख्याधिकारी तथा प्रशासक पाचोरा नगरपरिषद पाचोरा








