ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव तालुका पाचोरा भडगाव तालुक्यां मध्ये सप्टेंबर 2025 यामहिन्यामध्ये मोठ्या प्रमांणात अतिवृष्टी झाल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले त्यामुळे खरीप हंगाम पुर्णत: वाया गेला याबाबत पाचोरा भडगाव आमदार किशोर पाटील यांनी प्रत्येक नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कृषी मंत्री यांची भेट घेऊन दोन्ही तालुक्यातील शेतकर्याना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी लावून धरली अखेर त्या मागणीला यश आले


महाराष्ट्र राज्यातील 247 सरसकट मदतीच्या यादित भडगाव पाचोरा दोन्ही तालुक्याचा समावेश असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगीतले गेल्या महीन्यात पाचोरा व भडगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकाचे पुर्णत: नुकसान झाले त्यामुळे दोन्ही तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत पाचोरा तालुक्यात तर अक्षरश: जमीनी खरडून गेल्या जनावरे दगावली घरे जमिनदोस्त झाली ही परीस्थीती उद्भवल्याने रब्बी हंगाम कसा पेरायचा असा प्रश्न शेतकर्यासमोर होता शेतकर्याची ही विदारक परीस्थीती पाहून आमदार किशोर पाटील यांनी लगेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे कृषी मंत्री दत्तामामा भरणे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन मदत व पुनर्वसन मंत्री मदन पाटील यांची भेट घेऊन पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकर्याना पुन्हा उभे करण्यासाठी सरसकट भरपाई देण्याची मागणी केली त्यानुसार राज्य शासनाने ज्या 247 तालुक्यात सरसकट भरपाई देण्याचे घोषित केले आहे त्यात दोन्ही तालुक्याचा समावेश आहे त्यामुळे दोन्ही तालुक्यातील शेतकर्याना भरपाई मिळणार असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगीतले दरम्यान शासनाने भरपाईच्या रकमेत मोठी वाढ केली आहे आजपर्यंतची सर्वात मोठी भरपाई शेतकर्याना मिळणार आहे शासनाच्या या निर्णयाबद्दल आभार मानणार असल्याचे त्यांनी सांगितले प्रतिक्रीया अतिवृष्टीने खरीप हंगाम पुर्णत: उध्वस्त झाला त्याची परीस्थीती पाहून माझ्याही डोळ्यात पाणी आले होते शेतकर्याच्या नुकसानीची वस्तुस्थीती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांच्याकडे मांडली त्यांनी दोन्ही तालुक्याचा समावेश सरसकट भरपाईच्या यादित केल्याने खर्याअर्थाने शेतकर्याना न्याय दिला आहे
किशोर पाटील आमदार-पाचोरा-भडगाव


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button