जि जळगाव ता पाचोरा डॉ.प्राध्यापिका सौ सुनिता मंडोळे/ गुंजाळ.. एक उत्तम सुत्र संचालीका आणि सोबतच उत्कृष्ठ वकृत्व कला लाभलेले व्यक्तीमत्च आज त्यांचा वाढदिवस ……पाचोरा तालुक्यातील मोंढाळे हे त्यांचे माहेर शब्दांकन अनिल आबा येवले पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता

डॉ.प्राध्यापिका सौ सुनिता मंडोळे/ गुंजाळ.. एक उत्तम सुत्रसंचालीका आणि सोबतच उत्कृष्ठ वकृत्व कला लाभलेले व्यक्तीमत्च आज त्यांचा वाढदिवस ……पाचोरा तालुक्यातील मोंढाळे हे त्यांचे माहेर माहेरी पण राजकीय व सामाजिक कार्याचा भला मोठा वारसा त्यांना लाभलेला कै. भास्करराव गुंजाळ हे नाव पाचोरा पंचक्रोशीत नावाजलेलं. सासर चाळीसगाव तालुक्यातील सासरी ही राजकीय व सामाजिक कार्याचा वारसा हा वारसा जपत आदर्शावर मॅडम त्यांचा प्रवास करताना दिसतात.डॉ.सुनिता मांडोळे गुंजाळ यांचा शैक्षणिक प्रवास हा इयत्ता 10 वी मध्ये खंड पडल्यानंतर पुन्हा शिक्षण नव्याने सुरू करून एम.ए.बी.एड पीएचडी पर्यंतच उच्च शिक्षण घेऊन एस. एस. एम.एम. महाविद्यालय येथे विद्या दानाचं काम करतात त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले नोकरी राजकारण समाजकारण शिक्षण अशा विविध क्षेत्रात त्यांनी स्वतःच्या कर्तुत्वाचा एक वेगळाच ठसा उमटवलेला आहे त्या अनेक सामाजिक व शासकीय कमिट्यांवर काम करतात त्यामध्ये महिला दक्षता समिती पाचोरा पोलीस स्टेशन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव तालुका विधी सेवा प्राधिकरण पाचोरा जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेले आहे तसेच आता विभागीय संघटक म्हणून काम बघतात. महाविद्यालयात एक विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा प्रवास हा अनेक विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श म्हणून घेण्यासारखा आहे स्त्रियांनी आलेल्या खडतर अडचणी संकटांवर मात करत स्वतःची एक वेगळी वाट जोपासली पाहिजे हेच त्यांच्या जीवन प्रवासातून आपल्याला दिसून येते. त्यांच्या सुस्वभावी व्यक्तिमत्वामुळे अनेक विद्यार्थीनी विद्यार्थ्यांच्या त्या लाडक्या प्राध्यापिका आहेत… पाचोर्यातील अनेक सामाजिक संघटनांशी जोडल्या गेल्या आहेत विद्यादाना बरोबरच समाजसेवा करण्याची देखील त्यांना आवड आहे अशा या उत्तुंग व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा









