ताज्या बातम्या

मनसे जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांच्या नेतृत्वात मनसे शहराध्यक्ष ऋषिकेश भोई यांनी प्रांत अधिकारी यांना निवेदन दिले आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी शेतकऱ्यां साठी महत्वपूर्ण कार्य केले त्यांचे अभिनंदन शेतकऱ्यांचे पैसे हे कष्टाचे असतात हरामाचे नसतात म्हणून आज आपण कृषिप्रधान देशाचे शेतकरी पुत्र आहोत याची जाणीव ठेवली पाहिजे ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांनी विचार केला पाहिजे होता यावेळी मनसे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकरे जिल्हा संघटक शुभम पाटील मनसे जिल्हाध्यक्ष कृष्णा दुंदुले मनसे शहराध्यक्ष निलेश मराठे वाल्मीक जगताप जितेंद्र नाईक आदी मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते


मा. उपविभागीय अधिकारी सो जिल्हा जळगाव तालुका
पाचोरा भाग पाचोरा विषय : पाचोरा तहसील अनुदान घोटाळा प्रकरणी जबाबदार तहसीलदार व इतर दोषींवर कठोर कारवाई करण्याबाबत निवेदन मा. महोदय वरील विषयास अनुसरून मी आपल्या निदर्शनास अत्यंत गंभीर व जनहिताला बाधा आणणारा पाचोरा तहसील अनुदान घोटाळा हा प्रकार आणत आहे या घोटाळ्यात थेट तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांचा सहभाग असून विद्यमान तसेच तात्कालीन तहसीलदारांची भूमिका अत्यंत संशयास्पद आणि जबाबदार असल्याचे स्पष्ट होत आहे सन 2022 ते 2024 या कालावधीत झालेल्या प्राथमिक चौकशीनुसार पाचोरा तालुक्यातील शेतकरी अनुदान योजनेंतर्गत तब्बल रु. 1 कोटी 20 लाख 13 हजार 517 इतक्या प्रचंड रकमेचा अपहार झाल्याचे उघड झाले आहे शासनाने शेतकऱ्यांच्या विकासासाठी तरुणांसाठी व विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी दिलेला निधी संगनमताने बेकायदेशीर पद्धतीने काही अधिकाऱ्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी वळवला परिणामी हजारो शेतकरी विद्यार्थी व महिला नागरिक फसवले गेले असून त्यांच्या सामाजिक आर्थिक व मानसिक आयुष्यावर गंभीर परिणाम झाला आहे प्रकरणातील महत्त्वाचे मुद्दे तहसील कार्यालयातील संगणकीय प्रणालीवरील लॉगिन आयडी व पासवर्ड हे केवळ तहसीलदारांच्या जबाबदारीत असतात मात्र या आयडीचा बेकायदेशीर वापर करून शेतकऱ्यांच्या नावे बनावट अभिलेख तयार करण्यात आले व शासनाच्या अनुदान रकमेचा अपहार करण्यात आला चौकशीत महसूल सहाय्यक अमोल भोई व मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी गणेश चव्हाण यांचा सहभाग स्पष्ट झाला आहे या दोघांनी बनावट शैक्षणिक कागदपत्रे आधारकार्ड व बँक पासबुक सादर करून अर्ज दाखल केल्याची नोंद आहे शासनाच्या प्रणालीचा गैरवापर करताना संबंधित अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून कर्तव्यकठोरता टाळली. यामुळे त्यांची प्रशासकीय व फौजदारी जबाबदारी निश्चित होते या प्रकरणात विद्यार्थ्यांची वैयक्तिक कागदपत्रे देखील बेकायदेशीरपणे वापरण्यात आली आहेत परिणामी अनेक विद्यार्थी व महिला नागरिक मानसिक तणावाखाली गेले आहेत एवढेच नव्हे तर ज्यांनी कधीही पैसे घेतले नाहीत त्यांच्याकडून बेकायदेशीर पद्धतीने वसुलीची घाई केली जात आहे. काहींची बँक खाती कोणत्याही कायदेशीर आधाराशिवाय सील करण्यात आली आहेत या घोटाळ्यामुळे पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे शासनाने उपलब्ध करून दिलेल्या योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही यामुळे शेतकऱ्यांमध्ये व समाजामध्ये तीव्र रोष पसरला आहे सदर प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल झालेला असून तो जळगाव येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे त्यामुळे सखोल तपास करून दोषींना शिक्षा व अपहाराची वसुली होणे अत्यावश्यक आहे माझ्या ठोस मागण्या पुढीलप्रमाणे आहेत सर्वप्रथम पाचोरा तहसीलदार यांना प्रकरणातील मुख्य आरोपी मानून तातडीने निलंबित करावे विभागीय स्तरावर शासकीय उच्चस्तरीय ऑडिट चौकशी त्वरित सुरू करावी महसूल सहाय्यक अमोल भोई व प्रशिक्षणार्थी गणेश चव्हाण यांच्यासह सर्व दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करून अपहाराची संपूर्ण वसुली करावी निर्दोष शेतकरी विद्यार्थी व महिला नागरिक यांना झालेल्या मानसिक आर्थिक व सामाजिक त्रासाची भरपाई देण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना करावी हा घोटाळा हा केवळ आर्थिक अपहार नसून शेतकरी विद्यार्थी आणि सर्वसामान्य समाजाच्या विश्वासघाताचे जिवंत उदाहरण आहे शासन व न्यायव्यवस्था यांनी या प्रकरणात तातडीने सक्त कारवाई करून दोषींना शिक्षा करावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा, ही माझी नम्र विनंती अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल ऋषिकेश संजय भाई शहराध्यक्ष मनसे पाचोरा
ता. पाचोरा, जि. जळगाव
प्रत रवाना
मा.मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मुंबई
मा. पोलीस महासंचालक मुंबई
मा. विभागीय आयुक्त नाशिक
मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश जळगाव
मा. जिल्हाधिकारी जळगाव
मा. पोलीस अधीक्षक जळगाव
मा. संदीप पाटील पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा जळगाव


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button