जिल्हा जळगाव तालुका पाचोरा येथील खुशी पटवारी हिची महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग झेप – गुणवत्तेत मानाचं स्थान मिळवत परिसराचं नाव उज्वल झालं

पाचोऱ्यासारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरणारी एक अत्यंत आनंददायी आणि गौरवशाली बातमी समोर आली आहे. द वर्ल्ड इंटरनॅशनल स्कूल पाचोरा येथील आठवी इयत्तेतील कु. खुशी राजेश पटवारी हिने महाराष्ट्र शासनाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरावर उल्लेखनीय यश मिळवत गुणवत्तावान विद्यार्थ्यांच्या यादीत आपली जागा पक्की केली आहे. जानेवारी २०२५ मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सहभागी झालेल्या जवळपास ३,८७,००० विद्यार्थ्यांपैकी खुशी पटवारी हिने उल्लेखनीय कामगिरी करत मेरिट यादीत आपले नाव चमकावले असून तिच्या या यशाबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून आणि विशेषतः पाचोरा शहरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे ही परीक्षा महाराष्ट्रभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी एक मोठी शैक्षणिक संधी असते या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता गणित आणि भाषा विषयातील आकलनशक्ती तार्किक बुद्धिमत्ता वाचनगती आणि सखोल समज यांची कसोटी लागते अशा परीक्षेत मेरिट यादीत स्थान मिळवणे ही एक अत्यंत सन्मानाची आणि मेहनतीची गोष्ट असते खुशीने ही गोष्ट आपल्या चिकाटी अभ्यास आणि सातत्यपूर्ण प्रयत्नाच्या जोरावर साकारली आहे तिच्या या यशामुळे तिला महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिष्यवृत्तीच्या स्वरूपात दर महिन्याला आर्थिक मानधन मिळणार असून हे मानधन तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी निश्चितच उपयोगी ठरणार आहे खुशीचा हा यशस्वी प्रवास केवळ तिच्या परीक्षेतील गुणांपुरता मर्यादित नसून ती एक सर्वांगिण गुणवत्तेची विद्यार्थिनी आहे यापूर्वीही तिने विविध स्तरांवरील परीक्षा स्पर्धा व उपक्रमांमध्ये सहभाग घेत आपल्या शालेय आयुष्यात अनेक गौरवशाली कामगिरी बजावली आहे तिला विविध विषयांमध्ये विशेष गोडी असून ती नेहमीच ज्ञानप्राप्तीसाठी उत्सुक असते तिच्या अभ्यासातील सातत्य वेळेचे योग्य नियोजन आणि आत्मविश्वास हे तिच्या यशामागचे मुख्य घटक आहेत. खुशी पटवारी हिची पार्श्वभूमी देखील उल्लेख करण्याजोगी आहे ती कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा येथील भुसार मालाचे व्यापारी सतीशशेठ यांची नात असून प्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार राजेश पटवारी यांची ज्येष्ठ कन्या आहे वडीलांच्या सामाजिक जाणीवा वृत्तपत्र क्षेत्रातील दीर्घ अनुभव आणि आई-वडिलांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन हे तिच्या घडणीत मोलाचे ठरले आहे ज्ञान शिस्त आणि समाजप्रती असलेली बांधिलकी यांचे संस्कार तिला बालपणापासूनच लाभले आहेत या यशाचा परिसरात अत्यंत सकारात्मक प्रभाव पडला आहे विविध सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी खुशीच्या या यशाचे कौतुक करत तिला उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत तिच्या शाळेतील शिक्षक वर्गमित्र शेजारी नातेवाईक तसेच पाचोऱ्यातील सर्वच नागरिक तिच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त करत आहेत विशेषतः विद्यार्थिनी असूनही अशा मोठ्या स्तरावरील शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवणे हे इतर विद्यार्थिनीं साठीही एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे खुशी हिने याआधीही वेगवेगळ्या परीक्षांमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करत विविध सन्मान प्रशस्तीपत्रे आणि गोल्ड मेडल्स मिळवले आहेत त्यामुळे तिचे नाव आधीपासूनच शैक्षणिक क्षेत्रात प्रसिद्ध होतेच मात्र शिष्यवृत्ती परीक्षेतील हे यश तिच्या नावाला अधिक प्रतिष्ठा आणि ओळख देणारे ठरले आहे तिच्या शाळेतील शिक्षिका व मुख्याध्यापकांनीही सांगितले की खुशी ही अत्यंत नम्र शिस्तप्रिय अभ्यासू आणि ध्येयवेडी विद्यार्थिनी आहे अभ्यासाव्यतिरिक्त सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही ती सक्रीय सहभाग घेत असल्यामुळे तिच्या व्यक्तिमत्त्वात सर्वांगीण घडण दिसून येते तिच्या यशामुळे तिच्या शाळेच्या शिक्षणपद्धतीला आणि व्यवस्थापनाला देखील दाद मिळत आहे द वर्ल्ड इंटरनॅशनल स्कूल हे पाचोऱ्यातील एक नामांकित शिक्षणसंस्थान असून येथील विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करत असतात. त्यामध्ये खुशीच्या यशाची भर पडल्यामुळे इतर विद्यार्थ्यांमध्येही एक सकारात्मक ऊर्जा संचारली आहे या यशाचे खरे श्रेय खुशीच्या अथक मेहनतीला पालकांच्या प्रोत्साहनाला आणि शाळेच्या शैक्षणिक वातावरणाला जाते. तिने आपल्या नावाप्रमाणेच खरंतर संपूर्ण कुटुंबात आणि परिसरात आनंदाचा माहोल निर्माण केला आहे तिचा हा प्रवास यशाकडून अधिक मोठ्या यशाकडे घेऊन जाईल याची खात्री बाळगता येते. तिचे भविष्यातील स्वप्न काय आहे कोणत्या क्षेत्रात ती पुढे जाईल हे येणारा काळच सांगेल मात्र इतकं निश्चित की तिची जिद्द कष्टाची तयारी आणि यश मिळवण्याची तीव्र इच्छा तिला नक्कीच शैक्षणिक व व्यावसायिक जीवनात उत्तुंग शिखरांवर घेऊन जाईल. या गौरवशाली क्षणी तिच्या कुटुंबियांना शिक्षकवर्गाला शाळेला आणि परिसरातील सर्व नागरिकांना मनापासून शुभेच्छा पाचोऱ्यातील खुशी पटवारीसारख्या विद्यार्थिनींमुळे ग्रामीण भागातील मुलींनाही आपले स्वप्न मोठे बघण्याची आणि ते सत्यात उतरवण्याची प्रेरणा मिळत आहे. खुशीचे हे यश केवळ एका विद्यार्थिनीचे यश नसून ते संपूर्ण पाचोऱ्याचे, जिल्ह्याचे आणि ग्रामीण भागातील गुणवत्तेचे प्रतीक आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा



