जोपर्यंत राज्यात कर्जमाफी नाही तोपर्यंत वसुली नाही अन्यथा वसुली करणाऱ्यांना उलटा टाकू मा बच्चू कडू यांचा सरकारला इशारा विनाकारण भ्रष्टाचारी मार्गाने जमा करण्यात आलेला अब्जोंनी काळा पैसा स्विस बँकेतून कधी काढणार कशासाठी निवडणूक लढवतात मला तर समोर दिसतं राज कारणी फक्त स्वतःचे खिसे भरण्यासाठी निवडणूक लढवतात जनता बोलत नाही हेच मुख्य कारण भारत सोने की चिडिया होता काय झालं? जनतेला लागलय धर्माच वेड? त्यामुळेच सत्य पाहण्यासाठी आणि ठाम बोलण्यासाठी जनतेला वेळ भेटत नाही ती ताकद होती राजे छत्रपती यांच्याकडे जय राजे छत्रपती देशातच चोरी करतात देशद्रोही

जोपर्यंत महाराष्ट्र राज्यात कर्जमाफी नाही तोपर्यंत वसुली नाही अन्यथा वसुली करणाऱ्यांना उलटा टाकू माननीय बच्चू कडू यांचा सरकारला इशारा महाराष्ट्रात राज्यात शेतकरी आत्महत्या फक्त मार्चमध्ये 250 आणि एप्रिलमध्ये 229 पर्यंत कर्जमाफीसाठी सातत्याने आंदोलन सुरू असून कर्जमाफी झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही बच्चू कडू यांनी विज बिल आणि शेतकरी कर्जमाफी जून मध्ये मोझरी येथे राष्ट्रसंत तुकाराम महाराज समाधीस्थळी उपोषण केले होते त्यानंतर महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मध्यस्थी करून आश्वासन दिल्यानंतर माननीय बच्चू कडू यांनी आंदोलन स्थगित केलं होतं शासनाने समिती स्थापन करून वचन दिलं होतं परंतु आत्तापर्यंत शासनाकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही त्यानंतर बच्चू कडू आक्रमक झाले त्यांनी सात जुलैपासून पदयात्रा सुरू करण्याचा इशारा सरकारला दिला आहे 3 जुलै ला मंत्रालयात बैठक झाली प्रत्यक्षपणे अंमलबजावणी झालेली नाही म्हणून बच्चू कडू यांनी 7 जुलै पासून पदयात्रेला सुरुवात करणार आहे असा इशारा महाराष्ट्र शासनाला दिला शेतकरी आत्महत्यांची दिवसेंदिवस वाढ होत असल्याने चिंता वाढली परंतु सरकारला अजूनही घाम फुटत नाही सरकार करता तरी काय? मोठमोठ्या उद्योगपतींना करोडो रुपयांचे कर्ज माफ करत आहे शेतकरी ना हमीभाव तर नाहीत बोगस बियाणे बोगस औषधी बोगस खते यावर नियंत्रण नाही शेतकरी मरतो मरू द्या मटरेल बियाण्याचे भाव आणि त्यावर जीएसटी मग शेतकरी करणार तरी काय असे माननीय बच्चू कडू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले 1 मार्च ते 31 जुलै पर्यंत 767 शेतकरी आत्महत्या झाल्या ही माहिती राज्य सरकारने अधिकृतपणे जाहीर केली मग सरकार कोणाचे असा प्रश्न शेतकरी राजाला पडला आहे आर्थिक अडचणी सावकारी कर्ज नापिकी कर्जाचा बोजा विमा भरून विम्याचे पैसे न भेटणे अनेक ठिकाणी विमा कंपनीने विम्याचे पैसे दिले परंतु ते शेतकऱ्यांच्या खात्यावर आलेच नाही अशा अनेक समस्या विज बिल वसुली कर्ज वसुली ही मुख्य कारण असल्याची चर्चा शेतकऱ्यांनी केली सरकारने आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची समिती गठित केली अजून पर्यंत पावसाळी अधिवेशनात त्याचा गोषवारा झाला नाही विरोधी पक्षांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली असून सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निष्क्रिय असल्याची टीका केली विरोधी पक्षांनी अशीही टीका केली की निवडणुकीच्या पहिले सरकारने आश्वासन दिले ते हवेतच विरले का?











