जिल्हा जळगाव तालुका पाचोरा लोहारा येथे एकता दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दिव्यांग गुणवंत विद्यार्थी व पाल्य यांचा गुणगौरव सत्कार व शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न

लोहारा ता. पाचोरा प्रतिनिधी
एकता दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेतर्फे इयत्ता 10 व 12 वीचे 2025 या वर्षी उत्तीर्ण झालेल्या दिव्यांग विद्यार्थी व विद्यार्थींनी आणि दिव्यांग पाल्य यांचा सन्मान व त्यांचा गुण गौरव करण्यात आला तसेच शालेय साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम दि.06/07/2025 रविवार रोजी सकाळी 9 : 00 वाजता भाजपा कार्यालय लोहारा येथे पार पडला सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीस आराध्य बहुजन नायक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्याचे पूजन करण्यात आले एकता दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेतर्फे शालेय साहित्य वाटप करण्यात आले तर डॉ जे जी पंडित विद्यालयाचे शिक्षक श्री सुर्वे सर यांचे कडून परीक्षा पॅड वाटप करण्यात आले स्वामी समर्थ जनरल स्टोअर्सचे संचालक मधुकर कासार यांनी पाण्याच्या बाटल्या वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य व भाजपा ज्येष्ट कार्यकर्ते कैलास आप्पा चौधरी ग्रामपंचायत उपसरपंच दिपक खरे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल तडवी पत्रकार संघाचे सदस्य दिपक पवार दिलीप चौधरी कृष्णा आप्पा शेळके रमेश आप्पा शेळके चंद्रकांत पाटील गजानन क्षीरसागर व इतर सदस्य हजर होते विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन विकास देशमुख विवेक जाधव रमेश लिंगायत प्रभाकर काळू चौधरी डॉक्टर विकास पालीवाल दीपक गोंधळे प्रतापराव सुर्वे सुभाष बाविस्कर उखर्डू बाविस्कर जयेंद्र डांबरे व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते सदरील शालेय साहित्य वाटप कार्यक्रमांमध्ये बोलताना कैलास चौधरी यांनी दिव्यांग बांधव यांना तुमच्या न्याय हक्कासाठी शेवटपर्यंत तुमच्या सोबत असल्याचे सांगितले प्रथमेश मराठा समाजाचे खजिनदार भुसांडे गुरुजी यांनी आपल्या मुलांना चांगले शिकवून चांगले संस्कार द्या म्हणजे ते अन्यायाविरुद्ध वाचा फोडतील अशी अपेक्षा व्यक्त केली मोबाईलचा योग्य वापर करून शिक्षणात ध्येय गाठावे तसेच डॉक्टर जे जे पंडित विद्यालयाचे शिक्षक श्री सुर्वे सर यांनी शिक्षणाचे व एकतेचे महत्त्व विशद करून सांगितले उपस्थित मान्यवरांचा टोपी रुमाल पुष्पगुच्छ देऊन संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार एकता दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी मानले एकता दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष श्री. सुरेश पाटील सचिव श्री. विजय जाधव खजिनदार श्री. कांतीलाल राजपुत सदस्य श्री. विकास शिवदे बाळू जाधव अनिल चौधरी प्रवीण शेळके अनिल राजपुत अहमदखान पठाण व गावातील परिसरातील सर्व दिव्यांग बंधु-भगिनी उपस्थित होते



