दूध का दूध पाणी का पाणी ईव्हीएमची पोल खोल करण्यासाठी 3 डिसेंबरला बॅलेट पेपरवर मतदान गोळ्या घातल्या तरी बॅलेट पेपरवर मतदान होणार संपूर्ण भारताचे लक्ष माळशिरस गावाकडे

दूध का दूध पाणी का पाणी ईव्हीएमची पोल खोल करण्यासाठी 3 डिसेंबरला बॅलेट पेपरवर मतदान गोळ्या घातल्या तरी मतदान होणार माळशिरस गावाकडे राज्याचे नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष पंढरपूर माळशिरस मारर्कर वाडी ग्रामस्थांनी ईव्हीएम मशीन विरोधात झालेल्या मतदानावर आक्षेप घेतला आहे ईव्हीएम मशीन मधून झालेल्या मतदानाची पोल खोल करण्यासाठी तीन डिसेंबरला बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा ठराव केला आहे ही ठराव प्रक्रिया पार पाडण्यासाठी तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी सहकार्य करावे अशी विनंती सरपंच व्ही व्ही मारर्कड यांनी केले आहे विधानसभेच्या निवडणुकीत माळशिरस मधून महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) उमेदवार उत्तम जानकर हे 13 हजाराच्या मताधिक्य घेऊन विजयी झाले जानकर यांनी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा पराभव केला जानकर यांचा कमी मतांनी झालेला विजय मारकरवाडी ग्रामस्थांना मंजूर नसून जानकर हे 1 लाख पेक्षा जास्त मताधिक्यांनी विजयी झाले पाहिजे होते असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे जानकर यांचे मताधिक्य घटण्यामागे ईव्हीएम मशीनचे कटकारस्थान असू शकते मारर्कर वाडी मध्ये जानकर यांना 80 टक्के मतदान झाले तर ईव्हीएम मशीन मधून वेगळीच आकडेवारी येत आहे निवडणुकीत राम पाचपुते यांना 843 मते मिळाली तर जानकर यांना 1003 असे मतदान मिळाले या मतदानाचा गावकऱ्यांना संशय आहे त्यामुळे संपूर्ण गावकऱ्यांनी ठरवले मतदान बॅलेट पेपरवर करण्याचा निर्णय घेतला सातपुते यांना मिळालेल्या 843 मतदाना वर संशय असून त्यांना गावातून 100 ते 150 मतदान मिळू शकते आणि मिळालीच पाहिजे होती असे गावकऱ्यांचे ठाम म्हणणे आहे मतदानाची शहानिशा करण्यासाठी जानकर गटाने स्वखर्चाने बॅलेट पेपरवर परत निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी माळशिरस तालुक्याचे तहसीलदार यांना निवेदन दिले आहे व शासकीय कर्मचारी देण्याबाबत सुद्धा निवेदन दिले आहे 3 डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर चाचणी घेण्याचा ठराव संपूर्ण गावाने केला असून संपूर्ण खर्च गावकरी करणार आहेत


