ताज्या बातम्या

अभिनव बहुउद्देशीय संस्थातर्फे अभूतपूर्व कार्यक्रमाचे नियोजन मराठी बहुउद्देशीय जिल्हा परिषद शाळा कायम स्वरूपी सुरू राहण्यासाठी अनेक उपक्रम शिक्षण संस्थाचालक शिक्षक पालक यांचा सहयोग महत्वपूर्ण असतो पूर्वी आमच्या आजोबा वाड_ वडिलांनी मराठी शाळेत शिक्षण घेऊन आज ते सरकारी नोकरीवर आहेत म्हणून सरकारी जिल्हा परिषद मराठी शाळेत सुद्धा विद्यार्थी हुशार होतात शिक्षकांनी व्यवस्थित लक्ष द्यावे पालकांनी सरकारी शिक्षण संस्थेत आपले मुले शिकवावे नानासो संजय वाघ


(पाचोरा प्रतिनिधी अनिल आबा येवले)
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब कोविडग्रस्त एच आय व्ही बाधित रुग्ण ज्यांना शिक्षण घेण्यासाठी पैसा नसतो त्यांच्यासाठी अभिनव बहुउद्देशीय संस्था नेहमी कार्यरत असते गोरगरीब शेतकऱ्यांची मुले यांच्याजवळ शिक्षणासाठी पैसा नसल्यामुळे त्यांना मराठी शाळेतच शिक्षण घ्यावे लागते त्यासाठी अभिनव बहुउद्देशीय संस्था गोरगरीब शेतकऱ्यांच्या पाल्यांना मोफत शिक्षण आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप दरवर्षी कार्यक्रम करण्यात येतो अभिनव संस्थेत शैक्षणिक साहित्य वाटप व गुणगौरव सोहळा पार पडला गरजू गरीब घरातील आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी अभिनव संस्था नेहमीच कार्यरत असते तसेच दहावी व बारावी मध्ये नाविन्यपूर्ण यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करते डॉ दिलीप पाटील डॉ सुवर्णा पाटील अभिनव संस्थेच्या माध्यमातून नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पिटीसी चेअरमन नानासो संजय वाघ उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सुवर्णा पाटील यांनी केले कार्यक्रमाला विशेष उपस्थिती युवा नेते जगदीश पाटील वडजी उपस्थित होते तसेच अभिनव संस्थेचे मार्गदर्शक डॉक्टर दिलीप भगवानराव पाटील गोरख भोसले पोलीस पाटील सौ. चेतना पाटील सामाजिक कार्यकर्ते धनराज रायगडे व त्यांचा सहकारी मित्र परिवार तसेच सामाजिक कार्यकर्ते तथा जेष्ठ पत्रकार अनिल आबा येवले सर राजेंद्र खैरनार व पालक वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन चंदा पाटील यांनी केले कार्यक्रमाचे नियोजन श्री उमाकांत नेहते यांनी केले


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button